एकूण ८९ लाख रुपयांची वसुली
वैजापूर, (प्रतिनिधी): येथील जिल्हा व अपर सत्र न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये एकूण १२४ प्रलंबित व वादपूर्व प्रकरणांचा निपटारा करण्यात येऊन ८९ लाख रुपयांची वसूल करण्यात आली.
या लोकअदालतीचे उद्घाटन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. जी. पाच्छे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी दिवाणी न्यायाधीश डी. एस. पिसाळ, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन. एस. काळे, न्यायाधीश एस. के. खान, न्यायाधीश एम. ए. बेंद्रे, वकील संघाचे अध्यक्ष मजहर बेग, सचिव तुषार थोट यांची प्रमुख उपस्थिती होती. पॅनल ल पंच म्हणून अॅड. भारती पडवळ, अॅड. गोरख उकिरडे, अॅड. अफसर पठाण, अॅड. कुलदीप साळवे यांनी काम पाहिले. या लोकअदालतीत दिवाणी, फौजदारी, चलनक्षम दस्तऐवज (परक्राम्य लेख अधिनियम), विद्युत प्रकरण, जमीन अधिग्रहण, मोटार अपघात व इतर स्वरूपांची प्रकरणे ठेवलेली होती.
यात ११९ प्रलंबित व ५ वादपूर्व अशा एकूण १२४ प्रकरणांचा तडजोडी अंती निपटारा करण्यात आला. यात प्रलंबित प्रकरणात ७० लाख ५३ हजार ५५५ रुपये तसेच वादपूर्व प्रकरणांत १८ लाख २४ हजार ९४५ रुपये अशी एकूण ८८ लाख ७८ हजार ५०० रुपयांची वसुली करण्यात आली. लोकअदालत यशस्वी करण्यासाठी सरकारी अभियोक्ता के. एस. गंडे, अॅड. एस. एस. ठोळे, आर. डी. थोट, पी. एस. साखरे, एच. एम. पठाण, आर. पी. बोडखे, ए. एम. बागूल, जे. डी. हरिदास, व्ही. जी. वाघ, पी. आर. बत्तासे, संतोष जेजूरकर, सचिन जानेफळकर, आर. डी. शिरसाठ, अनिल रोठे, सईद अली, विष्णू सवाई, इफ्तेखार शेख, डी. बी. बावचे, वाय. एन. थावरे, किशोर मतसागर, पांडुरंग पवार, वैभव ढगे, नितीन बोराडे, मुजाहिद शेख, जावेद बेग, संदीप गायकवाड, कामील शेख, प्रतीक्षा उबाळे, माया जाधव, ज्योती मगर, मयूरी साळुंके, अनुश्री पुंड तसेच न्यायालयीन अधीक्षक तुंगार, कर्मचारी अनिल साळवे, प्रकाश शिंदे, प्रशांत शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.












