पाकिस्तानात भीषण आत्मघाती हल्ल्यात ८ पोलिसांसह १४ जणांच्या चिंधड्या, २२ जखमी

Foto
इस्लामाबाद : इपाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील स्वात जिल्ह्यात एका पोलीस ठाण्याबाहेर आत्मघाती हल्ला झाला, ज्यात आठ पोलिसांसह १४ जण ठार झाले आणि २२ जण गंभीर जखमी झाले. पाकिस्तानी वृत्तसंस्था मडॉनफच्या वृत्तानुसार, हल्ल्याच्या वेळी जवळच्या काबल चौकात दहशतवादाविरोधात एक शांतता रॅली सुरू होती. स्वात जिल्हा पोलीस अधिकारी उमर खान यांनी सांगितले की, एक तरुण काबल पोलीस ठाण्याच्या गेटजवळ आला. पोलीस अधिकार्‍यांनी त्याला थांबवून त्याची झडती घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याने नकार दिला. पोलीस काही कारवाई करण्यापूर्वीच त्या तरुणाने स्वतःच्या स्फोटाचा स्फोट घडवला. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. पोलीस हाय अलर्टवर आहेत. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसर सील केला असून शोधमोहीम सुरू केली आहे.

स्फोटापूर्वी, रविवारी अनेक लोक दहशतवादाविरोधात शांतता रॅली काढत होते. आंदोलकांनी स्वातमधील वाढत्या दहशतवादी घटनांचा निषेध केला. डॉनच्या वृत्तानुसार, आंदोलकांनी सांगितले की त्यांच्या आंदोलनाचा एकच उद्देश आहे: परिसरात शांतता प्रस्थापित करणे आणि दहशतवाद संपवणे. त्यांनी सांगितले की ही सरकारची जबाबदारी आहे. असुरक्षिततेचे वातावरण असेच राहिल्यास, मोठ्या प्रमाणावर जनक्षोभ उसळू शकतो. आंदोलकांनी असाही आरोप केला की, स्वातच्या डोंगराळ भागात दहशतवादी उघडपणे सक्रिय असताना प्रशासन शांतताप्रिय नागरिकांवर कारवाई करते.

पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष झरदारी यांनी चौकशीचे आदेश दिले
पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी स्फोटातील मृतांबद्दल दुःख व्यक्त केले. राष्ट्रपती कार्यालयाच्या माहितीनुसार, त्यांनी संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांनी या घटनेचा निषेध केला आणि पोलीस महानिरीक्षकांकडून अहवालाची मागणी केली. मृतांच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त करताना ते म्हणाले, शांततेच्या शत्रूंना त्यांच्या दुष्ट हेतूंमध्ये कधीही यशस्वी होऊ दिले जाणार नाही. दरम्यान, खैबर पख्तुनख्वाचे राज्यपाल फैसल करीम कुंडी यांनी या स्फोटाचा निषेध केला आणि पीडितांप्रति शोक व्यक्त केला. ते म्हणाले, ङ्गङ्घदहशतवादी भ्याड हल्ल्यांनी राष्ट्राचे मनोधैर्य खच्ची करू शकत नाहीत.

जुलैमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये१५४ मृत्यू
पाकिस्तानमध्ये दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. पाकिस्तान इन्स्टिट्यूट फॉर कॉन्फ्लिक्ट अँड सिक्युरिटी स्टडीजच्या मासिक सुरक्षा अहवालानुसार, खैबर पख्तुनख्वामध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. अहवालानुसार, जूनमधील ७५ मृत्यूंच्या तुलनेत जुलैमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये दहशतवादाशी संबंधित १५४ मृत्यूंची नोंद झाली, म्हणजेच एकाच महिन्यात १०५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
जागतिक दहशतवाद निर्देशांकात पाकिस्तान दुसर्‍या क्रमांकावर
जागतिक दहशतवाद निर्देशांक २०२५ नुसार, पाकिस्तान बुर्किना फासो नंतर जगातील दुसरा सर्वाधिक दहशतवादग्रस्त देश बनला आहे. २०२४ मध्ये तो चौथ्या क्रमांकावर होता.