कोरोनाचे 153 बळी; आजही वाढले 50 रुग्ण

Foto
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा अहवाल पाहता 50 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 806 वर गेली आहे. तसेच घाटी रुग्णालयात आज आणखी तीन रुग्णांचा मृत्यू झाला असल्याने आतापर्यंत कोरोनामुळे 153 रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. 
औरंगाबादमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढत चालली आहे. आज सकाळी आलेल्या अहवालानुसार नारेगांव-1, पवन नगर, टिव्ही सेंटर-2, एस.टी. कॉलनी, एन-2-1, गल्ली नंबर-4, गजानन नगर-4, सुतगिरणी, गारखेडा परिसर-1, नवजीवन कॉलनी, एन-11-1, एन-8, सिडको-3, मोतीवाला नगर-1, एन-9 सिडको-1, कोतवालपुरा-1, आझाद चौक-1, मंजुरपुरा -1, आसेफिया कॉलनी-1, नुतन कॉलनी -1, एन-6 सिडको-2, सिटी चौक-1, गुलमंडी-1, कैलास नगर-1, मिल कॉर्नर -1, बजाजनगर -2, अंबिका नगर-5, आंबेडकर नगर-6, हर्सुल परिसर-2, बारी कॉलनी-1, सिव्हील हॉस्पीटल परिसर -1, जयसिंगपुरा-1, छावणी-1, दुधड-4,  इतर -1 या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 18 स्त्री व 32 पुरूष रुग्णांचा समावेश आहे. 
1502 कोरोनामुक्त तर 1151 रुग्णांवर उपचार
आज सकाळी आलेल्या अहवालानुसार 50 रुग्णांची भर पडली त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 हजार 806 झाली. त्यापैकी 1 हजार 502 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर 153 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 1 हजार 151 रुग्णांवर उपचार सुरू आहे. 
घाटीत आज तीन रुग्णांचा मृत्यू
घाटी रुग्णालयात आज पहाटे मंसूरी कॉलनी येथील 60 वर्षीय पुरुष, शिवशंकर कॉलनी येथील 70 वर्षीय स्त्री, रोशन गेट येथील 56 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यामुळे घाटी रुग्णालयात आतापर्यंत 114 मृत्यू झाले तर तीन विविध रुग्णालयात 38 तर मिनी घाटीत 1 असे एकूण 153 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला.