गंगापूर, (प्रतिनिधी) : निवडणूक आयोगाच्या निर्दे शानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष सघन पुनरिक्षण कार्यक्रम एसआयआर अंतर्गत गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघात मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
या मोहिमेदरम्यान गंगापूर खुलताबाद मतदार संघात तब्बल १५,५५१ मतदारांची दुबार नावे आढळून आली आहे. त्यातील २४२ दुबार मतदारांची नावे वगळण्यात आली आहे. मतदार शुद्धीकरणाचा मुख्य उद्देश म्हणजे त्रुटी दूर करून अचूक व पारदर्शक यादी तयार करणे हा आहे. यादी यासाठी मतदारांच्या नोंदीची सखोल पडताळणी सुरू असून, एकाच व्यक्तीची नावे वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या स्वरूपात २४२ मतदारांची नावे वगळली.
नोंद झालेली असल्यास ती दुरुस्त किंवा वगळण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. दुबार नावे असलेल्या मतदारांची नावे वगळण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून आतापर्यंत २४२ मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत, अशी माहिती नायब
तहसीलदार मयुरा पेरे यांनी दिली.
आयोगाकडून त्यांनी सांगितले की, डीएसई प्रक्रिये अंतर्गत फॉरमॅट ए व कन्सेंट लेटर संबंधित मतदारांना पोस्टाद्वारे पाठवले जाते. त्यानंतर मतदाराच्या संमतीनुसार नावयोग्य ठिकाणी कायम ठेवलेजाते आणि दुसऱ्या ठिकाणचे नाव फॉर्म क्रमांक ७भरून वगळले जाते. ही संपूर्ण प्रक्रिया बीएलओमार्फत पार पाडली जाते. या उपक्रमामुळे मतदार यादीतील बनावट किंवा दुबार नोंदीवर आळा बसून केवळ पात्र मतदारांनाच मतदानाचा अधिकार मिळणार आहे.
परिणामी, आगामी पारदर्शक, निवडणुकाअधिक अचूक व निष्पक्ष पद्धतीने पार पाडण्यास मदत होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. सध्या सुरू असलेल्या या मोहिमेमुळे मतदार यादी शुद्धीकरणाला गती मिळाली असून, विश्वासार्ह व अद्ययावत यादी तयार करण्याच्या दृष्टीने पाऊलमहत्त्वाचे आहे. मतदार यादी अध्यायवत हे व ठरणार शुद्धीकरण करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन तहसील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.














