देशातील विविध घटनांमध्ये १६ जणांचा मृत्यू तर पाकिस्तानात १५ बालकांचा मृत्य

Foto
नवी दिल्ली : आज देशासाठी बुधवार घातवार ठरला. देशातील तीन ठिकाणी झालेल्या अपघातात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील एक घटना आंध्र प्रदेशातील नंदीयाल जिल्ह्यातील श्रीशैलम या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी घडली. आर्थिक अडचणींमुळे त्यांनी सामूहिकरित्या आयुष्याची अखेर केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतांमध्ये ३६ वर्षीय पुरुष, त्याच्या तीन बहिणी (वय ३३, ४५ आणि ५० वर्षे) आणि १५ वर्षांचा भाचा यांचा समावेश आहे. हे सर्वजण श्री सत्य साई जिल्ह्यातील रहिवासी होते.

आत्माकुरचे पोलीस उपअधीक्षक रामंजी नाईक यांनी सांगितले की, श्रीशैलममधील वड्डेरा सतरम (वड्डेरा समाजाद्वारे चालवले जाणारे लॉज) येथील एका खोलीत हे कुटुंब मृतावस्थेत आढळले. ङ्गङ्घएक पुरुष आणि एक अल्पवयीन मुलगा हॉलमध्ये मृतावस्थेत आढळले, तर तीन महिला बाथरुममध्ये मृतावस्थेत सापडल्या असे त्यांनी सांगितले.

लोखंडी सळ्यांनी भरलेल्या कंटेनरला आदळली भरधाव बस; सहा जणांचा मृत्यू; २० जखमी

तेलंगणाच्या सूर्यपेट जिल्ह्यात आज पहाटे ५ वाजून २० मिनिटांच्या सुमारास एक मोठा अपघात झाला. एका खाजगी प्रवासी बसची ट्रकशी धडक होऊन सहा जणांचा मृत्यू झाला. ही बस हैदराबादहून विजयवाडाकडे जात होती. बसमध्ये ४३ प्रवासी होते. अपघातात अनेक जण जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सूर्यपेट पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, एक खाजगी प्रवासी बस हैदराबादहून विजयवाडाकडे जात होती. दुर्गापुरम स्टेजजवळ अचानक एका ट्रकशी धडक झाली, तेव्हा बसमध्ये ४३ प्रवासी होते. या अपघातात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूर्यपेट पोलिसांनी सांगितले, ङ्गङ्घआम्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शवागारात पाठवले असून प्रकरणाचा तपास करत आहोत.

कीर्तन करत बसलेल्या लोकांना भरधाव कारने चिरडले; ५ जणांचा मृत्यू
बिहारच्या सुपौल जिल्ह्यात एक अत्यंत मन हेलावून टाकणारी दुर्घटना घडली आहे. मंगळवारी उशिरा रात्री एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेला बसून कीर्तन करणार्‍या सहा जणांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर उपचारादरम्यान आणखी दोघांनी प्राण सोडल्यामुळे मृतांचा आकडा आता ५ वर पोहोचला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या नातेवाईकांचा रोष अनावर झाला आहे.

मिळालेली माहितीनुसार, पिपरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कटैया चौकाजवळ एनएच-३२७ई वर बजरंगबली मंदिराच्या जवळ ही दुर्घटना घडली. काही नागरिक रस्त्याच्या कडेला बसून धार्मिक कीर्तन करत होते, त्याच वेळी एक अनियंत्रित आणि सुसाट वेगात असलेली कार त्यांच्या अंगावर आली. धडक इतकी जोरदार होती की कार सुमारे ५० मीटर पुढे जाऊन एका दुकानात जाऊन धडकली.  अपघातात तिलो दास (६५), राजो दास (५०) आणि सुरेंद्र यादव (४५) यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेले भुवनेश्री यादव, रामचंद्र यादव आणि कृष्णा साह यांना तातडीने सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यातील दोघांचा मृत्यू झाला, तर एका जखमीवर अद्याप उपचार सुरू आहेत.  दरम्यान, जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी या अपघातावर तीव्र शोक व्यक्त केला असून, मृतकांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

पाकिस्तानात १५ बालकांचा मृत्यू
इस्लामाबाद : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या सरकारी रुग्णालयात बुधवारी एक अत्यंत वेदनादायी  दुर्घटना घडली. रुग्णालयाच्या गायनॅकोलॉजी विभागातील नर्सरीमध्ये अचानक भीषण आग लागून १५ नवजात बालकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून नातेवाईकांकडून आक्रोश व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या एमसीएच प्रभागातील तिसर्‍या मजल्यावर असलेल्या नर्सरीमध्ये सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. नर्सरीतील एअर कंडिशनरचा कॉम्प्रेसर अचानक मोठ्या स्फोटासह फुटला. स्फोटानंतर काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण वॉर्डात दाट धूर पसरला.