बासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती
शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाला ३२ वर्षांनी यजमानपद
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जिल्हा युवक महोत्सवात पहिल्या दिवशी शुक्रवारी (दि.११) सात रंगमंचावर १८ कलाप्रकार सादर झाले, अशी माहिती सांस्कृतिक समनव्यक डॉ परमेश्वर पुरी यांनी दिली.
शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयात जिल्हास्तरीय युवक महोत्सवास शुक्रवारी थाटात सुरुवात झाली. या महाविद्यालयास तब्बल ३२ वर्षांनंतर यजमानपद मिळाले आहे. मुख्य मंडपात उद्घाटन समारंभ संपल्यानंतर लगेच सर्व संघप्रमुखांची बैठक घेण्यात आली. संचालक डॉ. कैलास अंभुरे, प्राचार्य डॉ वैशाली देशमुख, जिल्हा समन्वयक डॉ. देवराज दराडे व डॉ. समाधान इंगळे यांनी स्पर्धेसंदर्भात सूचना व नियमावली समजून सांगितले. पहिल्या दिवशी सात सभामंडपात एकूण १८ कलाप्रकार सादर झाले. यामध्ये सृजनरंग (वंदे मातरम सभागृह) मुकाभिनय, एकांकिका, मिमिक्री. तालरंग (क्रमांक दोन) या ठिकाणी भारतीय शास्त्रीय तालवाद्य, भारतीय शास्त्रीय सुर वाद्य, भारतीय शास्त्रीय नृत्य. नंदरंग (क्रमांक तीन) पाश्चात्य समूह गायन, पाश्चात्य सुगम
गायन, पाश्चात्य वाद्यवादन. ललितरंग स्पॉट फोटोग्राफ, पोस्टर, व्यंगचित्र आणि रांगोळीया स्पर्धा झाल्या. तर कला रंग (पाच) भारतीय समूह गायन, शब्दरंग (सहा व सात) या मंचावर वादविवाद, वक्तृत्व, प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली.
युवा महोत्सव 2026-27
उपस्थितांची जिंकली मने : युवक
महोत्सवात यावेळी कलावंतांनी एकापेक्षा एक सादरीकरण उपस्थितांची मने जिंकली. यावेळी विविध स्पर्धेतून सामाजिक संदेश दिला. पहिल्याच दिवशी शास्त्रीय सूर वाद्य, भारतीय शास्त्रीय नृत्य, गायन, वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. यावेळी विविध सामाजिक संदेश देण्यात आला. एकापेक्षा एक कला सादर करून भरभरून दाद मिळविली.
संभाजीनगर
भाजीनगर















