डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ग्रंथालयात १८ तास अखंड वाचन उपक्रम

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) येथील इंद्रराज कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय ग्रंथालच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १८ तास अखंड वाचनाचा अभिनव उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळी ६ वाजता या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

विद्यार्थी, शिक्षक, ग्रंथप्रेमी नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून सलग १८ तास -विविध विषयांवरील पुस्तके, - साहित्य, संशोधन ग्रंथ यांचे वाचन केले. विशेषतः भारतीय संविधान, सामाजिक सुधारणा, इतिहास आणि व्यक्तिमत्व विकास यांसारख्या विषयांवर भर देण्यात आला. या उपक्रमा दरम्यान काही वाचकांनी आपल्या अनुभवांची देवाणघेवाण केली. 

तसेच वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्राचार्य डॉ. गुरुदत्त राजपूत यांनी सांगितले. की, आजच्या डिजिटल युगात मोबाईल व इंटरनेटमुळे वाचनाची सवय कमी होत चालली आहे, त्यामुळे अशा उपक्रमांद्वारे वाचनाची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रा विषयी पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.

प्राचार्य डॉ. राजपूत, उपप्राचार्य डॉ. लांब, ग्रंथपाल डॉ. सविता म्हस्के, डॉ. अनिरुद्ध मोरे, डॉ. बंडू काळे, डॉ. अशोक पवार, डॉ. जालिंदर अंभोरे, किरण राजपूत, कर्मचारी ग्रंथालय कर्मचारी ज्योती तोमर, यशवंत डापके आदी उपस्थित होते.