१८ हजारांवर शेतकऱ्यांच्य खात्यात १८०.४३ कोटी जमा

Foto
कर्जमुक्तीच्या तिसऱ्या टप्प्याचा बळीराजाला लाभ

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो) : कर्जमाफीच्या तिसऱ्या टप्प्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९२९ कर्जखात्यांमध्ये ८.८४ कोटी, तर इतर बँकांच्या १६ हजार ३९४ कर्जखात्यांमध्ये १७१.५९ असे एकूण १८ हजार ३२३ कर्जखात्यांमध्ये १८०. ४३ कोटी इतकी रक्कम जमा झाली आहे. आतापर्यंत एकूण ९३ हजार २६८ शेतकऱ्यांचे कर्जखात्यात एकूण ६९८. ९३ कोटी इतकी रक्कम जमा होऊन त्यांची कर्जखाती निरंक पूर्ण करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी दिली.

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व बँकांनी १ लाख ९० हजार ७०१ शेतकऱ्यांची माहिती कर्जमाफी योजनेच्या पोर्टलवर अपलोड केलेली आहे. यापैकी १ लाख २६ हजार २८६ शेतकऱ्यांची विशिष्ट आधार कार्ड प्राणिकरण केलेल्या शेतकऱ्यांच्या खाात्यात पैसे जमा, आधार प्रमाणीकरणाचे आवाहन
क्रमांकाची यादी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी प्रसिद्ध झाली असून, १ लाख २ हजार ९९९ शेतकऱ्यांनी त्यांचे आधार प्राणिकरण पूर्ण केले आहे. 

स्तरावरून ऑनलाइन पद्धतीने रक्कम जमा करण्यात येत आहे. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या याद्यांमधील २३ हजार २८७शेतकऱ्यांचे आधार प्राणिकरण होणे बाकी आहे. सहकारी संस्था मार्फत आवाहन जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपले सरकार केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण तातडीने करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या मार्फत करण्यात आले आहे.

-- आधार प्रमाणिकरण करून घ्यावा -- 
आधार प्रमाणिकरण करण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी यादीमध्ये नाव समाविष्ट
असल्याची खात्री करून अॅग्रीस्टॅक क्रमांक, मूळ आधारकार्ड व बचत खात्याचे पासबुक घेवून समक्ष आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन तातडीने आधार प्रमाणिकरण करून घेण्याचे आवाहन, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) समृत जाधव यांनी केले आहे.