छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : संपूर्ण राज्यात पावसाळा सुरू झाला असला, तरी मराठवाड्यातील अनेक भागांतील पाणीटंचाईचे संकट अद्याप कायम असल्याचे चित्र आहे. राज्य शासनाच्या ७ जुलै २०२६ रोजीच्या ताज्या टँकर अहवालानुसार, मराठवाड्यातील १०३ गावे आणि ८४ वाड्यांमधील नागरिकांची तहान भागवण्यासाठी अद्यापही २०० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने १५ शासकीय आणि १८५ खासगी टँकर रस्त्यावर उतरवले असून, पाणी उपशासाठी विभागभरात ६९१ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.
-
-
सर्वाधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा जालना जिल्ह्यात केला जात आहे. जालना जिल्ह्यातील ७० गावे आणि ३२ वाड्यांना १०७ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.
बीड जिल्ह्यात ६५, नांदेड जिल्ह्यात १५, परभणी जिल्ह्यात १२ तर लातूर जिल्ह्यात एका टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर छत्रपती संभाजीनगर, हिंगोली आणि धाराशीव या तीन जिल्ह्यांत एकही टँकर सुरू नसल्याचे अहवालावरून दिसून येते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू नसला तरी काही तालुक्यांतील टँकर योजना सुरू ठेवण्यासाठी मुदतवाढीचा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. प्रस्ताव विशेष म्हणजे, जून महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक भागांतील भूजलपातळी पुरेशी वाढलेली नसल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम आहे. त्यामुळे प्रशासनाला टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू ठेवावा लागत आहे.
https://epaper.sanjwarta. Powered By: Vrudhee Solutions