छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : चोरट्यांनी दशमेशनगर भागातून २ टाटा हॅरिअर कार पळविल्या. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर राधेश्याम तिवारी (४०, रा. मोतीरत्न झांबर इस्टेट, न्यू श्रेयनगर) आणि विवेकानंद दत्तात्रय भोसले (७१, रा. दशमेशनगर उस्मानपुरा) तक्रारदार आहेत. सागर तिवारी हे नगरसेवक रेणुकादास वैद्य यांच्या घरासमोर नेहमी कार उभी करतात. दरम्यान त्यांनी तेथे जाऊन पाहिले असता काचा पडलेल्या दिसल्या व कार (जीजे २१, ५६७८) गायब होती. दुसर्या घटनेत त्यांच्या घराजवळ राहणारे विवेकानंद भोसले यांची कार (एमएच २०, जीक्यू ९९२८) दशमेशनगरातील आपुलकी अपार्टमेंटच्या शेजारी रोडवरून चोरांनी पळविल्याचे समोर आले.












