वैजापूर येथे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी २ वर्षे सक्तमजुरी

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी): जिल् हा न्यायालयाचे जप्ती वॉरंट बजावण्यासाठी घरी गेलेल्या बेलिफाच्या हातातील वॉरंट फाडून, शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकारणी वैजापूर न्यायालयाने एकास दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व दहा हजार रुपये दंड ठोठावला. तसेच दंड न भरल्यास आणखी सहा महिने साधा कारावास भोगण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सतीश भानुदास वाणी (३२, रा. पाटील गल्ली, वैजापूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायाधीश एल. जी. पाछे यांनी १४ मे रोजी हा निकाल दिला.

७ जानेवारी २०१६ रोजी ही घटना घडली होती. त्यानंतर दिवाणीन्यायालयाचे (वरिष्ठ स्तर) मुख्य बेलीफ अनिल वसंतराव बिडवई यांनी दाखल केलेल्या प्रथम खबर अहवालावरून वैजापूर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली सतीश वाणी याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला व त्याचा तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक
आर.आर. जाधव वैजापूर न्यायालयाचा निवताला आणि अॅड. कृष्णा गंडे यांनी कामयांनी केला. 

वैजापूर येथील दिवाणी न्यायालयातील मुख्य बेलीफ अनिल बिडवई हे ७जानेवारी २०१६ रोजी दुपारी सव्वाबारा वाजता सतीश भानुदास वाणी व सीमा सतीश वाणी यांना वॉरंट बजावण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. तेव्हा सतीश वाणी यांनी जिल्हा कोर्ट, छत्रपती संभाजीनगर यांचे जप्ती वॉरंट बिडवई यांच्या हातातून घेऊन फाडून टाकले व शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणला. 

तपास पूर्ण झाल्यानंतर येथील सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. गजानन मंझा पाहिले. सुनावणीच्या वेळी दोन्ही बाजूंचे साक्षी, पुरावे तपासल्यानंतर आरोपीविरुध्द असलेला आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपी सतीश वाणी याला सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. पोलीस उपनिरीक्षक व्ही. ए. जाधव पैरवी अधिकारी होते.