आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत २० संघ सहभागी

Foto
आजीव सभासद विशाल लोळगे, आजीव सभासद अरुण गुदगे, स्पर्धा आयुक्त राहुल टेकाळे यांच्यासह आदी उपस्थित होते. जिल्हा क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष सुभाष लोळगे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
क्रीडा शिक्षकांवर जबाबदारी
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) :
शालेय क्रिकेटपटूंच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी प्रतिष्ठेच्या लोळगे आंतरशालेय क्रिकेट स्पर्धे चा थरार लवकरच रंगणार आहे. या स्पर्धेत २० नामांकित शाळांनी सहभाग निश्चित केला आहे. सर्व संघांची चार स्वतंत्र गटांमध्ये (अ, ब, क आणि ड) विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटात ५-५ संघांचा समावेश असल्याने साखळी फेरीपासूनच चुरस पाहायला मिळणार आहे, अशी माहिती औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव शिरीष बोराळकर यांनी दिली.
एडीसीए मैदानावर शुक्रवारी संध्याकाळी लोळगे चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेची गटवारी निश्चित करण्यात आली. या बैठकीस औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव शिरीष बोराळकर, सहसचिव करण डोगरा, कार्यकारिणी सदस्य निखिल मिटकर, हेमंत मुळे, स्पर्धेचे मुख्य आयोजक व
स्पर्धेत सहभागी प्रत्येक संघाच्या मार्गदर्शनाची व समन्वयाची जबाबदारी क्रीडा शिक्षकांवर सोपवण्यात आली आहे. यामध्ये शेख रफीक (नाथ व्हॅली), सी. के. जाधव (राजा शिवाजी), शेख एस. बी. (लिटल एंजल), अनिल केरकेरा (केंब्रिज), संजय कटुले (एस. बी. हायस्कूल), प्रवीण क्षीरसागर (स्टेपिंग स्टोन्स), प्रवीण वाघ (एंजल किड्स), सोमाजी बालुरे (आर. जे. इंटरनॅशनल), विनोद माने (सीएसएन), इंद्रजित उढाण (वूडब्रिज), बंटी राठोड (द वर्ल्ड), शेख शमीम (लिटल फ्लॉवर व नॅशनल इंग्लिश स्कूल), जितेंद्र चौधरी (गायकवाड ग्लोबल), सुभाष देशमुख (एसबीईएस सेंटेनरी), राठोड सर (एसएफएस), राहुल रगडे (एचएपी), अझहर शेख (देवगिरी ग्लोबल), रवी चाबुकस्वार (चाटे स्कूल) आणि प्रफुल्ल निर्मळ (होली क्रॉस) हे आपापल्या संघांची जबाबदारी सांभाळत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions