विहामांडवा येथील खुल्या कारागृहातील २० बंदी जणांकडून मोबाईलचा वापर

Foto
पाचोड पोलीस ठाण्यात २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

रमेश लिंबोरे
पैठण : तालुक्यातील विहामांडवा येथील खुले कारागरातील २० बंदी जणानी अवैध मार्गाने मोबाईलचा वापर केल्याचे उघडकीस आले असून या संदर्भात पाचोड पोलिसात २० बंदी जना सह एका कर्मचाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

वरिष्ठ तुरुंगाधिकारी दीपक लिंगाप्पा भोसले खुले कारागृह पैठण यांनी पाचोड पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील खुले कारागृह येथील आरोपी सलमान रफिक शेख राहणार अहिल्यानगर याने त्याच्या पदाचा गैरवापर करून २० बंदी जणांना अवैधरित्या वस्तू पुरवल्या असून (मोबाईल) यासंदर्भात कारागृह अधीक्षक यांना कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही.
-- ५८ हजार ३०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त --
कारागृहातील २० बंदी जणांनी संगणमताने अवैधरित्या वस्तू (मोबाईलचा) विनापरवाना स्वतःजवळ बाळगून कारागृह शासनाची दिशाभूल केली आहे. विनापरवानगी मोबाईल फोन वापरल्याचे लक्षात आल्याने दीपक लिंगाप्पा भोसले (वरिष्ठ तुरुंग अधिकारी) यांच्या फिर्यादीवरून पाचोड पोलीस स्टेशनचे पोलीस महेपो मगरे यांनी सलमान शफिक शेख राहणार अहिल्यानगर, बंदी क्र.सी. ५३४३ शेख रफिक अ/ गफू, बंदी क्र.सी.५१९९ रामू रमेश सोनवणे, बंदी क्र.सी.४९६३ आसिफ रोशन शेख, बंदी क्र.सी. ५६८५ नागेंद्र लालाकिशोर कनोजिया, बंदी क्र. सी. ५६२७ राजेश समयोद्दीनचौधरी, बंदी क्र. सी.५४७२ मंगेश सन्मुख गुमस्ते, बंदी क्र. सी.५१७४ शगीर शकील शेख, बंदी क्र. सी. ५१७८ शिवाजी रामाजी वडजे, बंदी क्र.सी. ५५०८ मुजफ्फर मासुक अलीशेख, बंदी क्र.सी. ५६०६ कृष्णा सिताराम पवार, बंदी क्र.सी.५५७१आकाश गंगाराम शिंगे, बंदी क्र.सी. ५४५७ शेख चांद पाशा बशीर, बंदी क्र.सी.५१८० जयसिंग देवाप्पा राठोड, बंदी क्र.सी. ५३६३ आसिफ खा. शब्बीर खा., बंदी क्र. सी. ५७१५ धारासिंग बकील सिंग बावरी, बंदी क्र. सी. ५६५६ नरसिंह शंकरराव तळणीकर, बंदी क्र.सी. ५५४७जयसिंग जब्बू पवार, बंदी क्र. सी.४५२५ सुनील निंबा पाटील, बंदी क्र.सी. ५५५५ मुस्तफा हिलाही शेख, बंदी क्र. सी. ५७९२ निलेश प्रकाश महामुनी, या २० बंदी जणांसह २१ जनाविरुद्ध गुन्हा र. क्र. ८१/२०२६ कारागृह फायदा १८९४ कलम ४२,४५ (१२) व भान्यास कलम २२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक पंडित यांच्या आदेशावरून पोलीस ब्राह्मणे यांच्याकडे पुढील तपास देण्यात आला आहे. नेमका हा प्रकार कधीपासून सुरू आहे तसेच यामध्ये कोण कोण सहभागी आहे याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.