गुंतवणुकीच्या नावाखाली घाातला २० लाखांचा गंडा शाखा व्यवस्थापकासह दोघांविरुद्ध गुन्हा

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून शहरातील एका खाजगी नोकरदाराला तब्बल २० लाख ५० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, कंपनीने दिलेले परताव्याचे पैसे चुकून तुमच्या खात्यावर जमा झाले असून ते दुसऱ्या खात्यावर पाठवावे लागतील, अशी बतावणी करत गुंतवणूक सल्लागार कंपनीच्या पुणे
शाखेतील व्यवस्थापकानेच ही रक्कम स्वतः च्या आणि नातेवाईकांच्या खात्यावर वळती करून घेतली.
पुण्याच्या खराडी येथील भन्साली व्हॅल्यू क्रिएशन कंपनीचा शाखा व्यवस्थापक आशिक अन्सारी (रा. हडपसर, पुणे) आणि रुबी सुलताना अहमद (रा. आझमगड, उत्तर प्रदेश) अशी फसवणूक करणाऱ्यांची नावे असून त्यांच्याविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एप्रिल २०२३ मध्ये काला यांचा अपघात झाल्याने ते काही काळ उपचार घेत होते. प्रकृती सुधारल्यानंतर २०२४ मध्ये त्यांनी अन्सारीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा मोबाइल बंद होता. त्यानंतर कंपनीच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधला असता, सर्व व्यवहार पूर्ण झाल्याचे सांगत अन्सारीला दिलेली रक्कम वैयक्तिक व्यवहार असल्याचे सांगण्यात आले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.
स्नेहल देसाळे यांच्या खात्यावर वर्ग केलेली १.५० लाखांची रक्कम त्यांनी २१ जानेवारी रोजी फिर्यादीला परत केली आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर काला यांनी संबंधितांकडे रक्कम परत मागितली; मात्र टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे त्यांनी जवाहरनगर पोलिस ठाणे गाठून दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions