छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने थेट भेट वधू-वर मेळावा घेण्यात आला. रविवारी समर्थ नगरातील समर्थ राम मंदिरात हा मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी मुलींचा प्रत्यक्ष सहभाग हे या मेळाव्याचे वैशिष्ट्य ठरले.
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातून, कोकण, विदर्भातून तसेच मुंबई, डोंबिवली ठाणे व पर राज्यातून हैदराबाद, तेलंगणा, हुबळी (कर्नाटक), इटावा, सोलापूर बार्शी मध्यप्रदेश रतलाम, गुजरात, बडोदा व आनंद येथून देखील या मेळाव्याला उपवर वधू-वरांची उपस्थिती होती. इच्छुक वधू-वरांनी स्वतःच परिचय करून दिला. मेळावा सकाळी ९ ते पाचपर्यंत सुरू होता. ठिकठिकाणी मदत कक्ष देखील उभारण्यात आले होते. मेळाव्यासाठी ३७९ मुले आणि २१६ मुलीची नोंदणी झाली. प्रत्यक्षात २४२ मुले ६७ मुली उपस्थित होत्या. मुलींची मागणी मुलगा कुठल्याही क्षेत्रातील असेल तरी चालेल पण त्याने मला माझ्या आई वडील ह्यांना ही समजून घ्यावे. जसे त्याला त्याचे आई - वडिलांनी शिकवले वाढवले, तसेच आमच्या बाबतीतही असल्याचे लग्नास इच्छुक मुलींनी सांगितले.
पॅकेज ७ ते ८ लाख पाहिजे
मुलांच्या पॅकेज बाबतीत ५, ६, ७ ते ८ लाख वार्षिक पॅकेज पाहिजे. आणि संसाराचा गाडा आम्ही दोघेही नोकरी करून ओढू. माझ्याही आई-बाबा व त्याच्या ही आई-बाबाकडे थोडी मदत करणारा पाहिजे, असे यावेळी लग्नासाठी इच्छुक मुलींनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुधीर नाईक, महिला जिल्हाध्यक्षा सुचेता पालोदकर, अंजली गोरे, स्मिता नगरकर, अंजली पराडकर, अॅड अश्विनी कुलकर्णी, दिलीप लाड, मोहन काळे, स्मिता जोशी, सुरेखा पारवेकर, संदीप बेदरकर, नंदू अदवंत, सुभाष जोशी, कालिदास त्रिवेदी, गायत्री न्यायाधीश, शशिकांत पाठक, विजय देशपांडे, अभिषेक तिवारीसह समन्वय समितीचे मिलिंद दामोदरे, माणिक रत्नपारखी आदींनी परिश्रम घेतले.
रेवा दीक्षितचा सत्कार
स.भु. महाविद्यालयातील १२वीची विद्यार्थीनी रेवा दीक्षितचा सत्कार केला.












