परतूर येथील दोघांविरुद्ध गुन्हा
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहाबाजार परिसरातील एका तरुण व्यावसायिकाची दुकान विक्रीच्या आमिषाने तब्बल २५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात जालना जिल्ह्यातील परतूर येथील दोन जणांविरुद्ध - गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहसीन जाफरी (वय २५, रा. शहाबाजार) यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, त्यांना - व्यवसायासाठी दुकान खरेदी करायचे होते. त्यासाठी - त्यांनी ओळखीचे एजंट नसीरउल्ला खाँ अब्दुल्ला खाँ कायमखानी आणि साजीद अली खान (रा. मोमीन मोहल्ला परतूर) यांच्याशी संपर्क साधला.
आरोपींनी मंजूरपुरा येथील एक दुकान स्वतःच्या मालकीचे असल्याचे सांगून ते विक्रीस काढले. दुकानाचा व्यवहार २५ लाख रुपयांत ठरल्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी टप्प्याटप्याने रोख व धनादेशाद्वारे संपूर्ण रक्कम आरोपींना दिली. दरम्यान, आरोपींनी दुकान लवकरच नावावर करून देण्याचे आश्वासन दिले. मात्र वारंवार टाळाटाळ होत असल्याने फिर्यादींनी चौकशी केली असता संबंधित दुकान हे अन्य व्यक्तीच्या मालकीचे असल्याचे समोर आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी पोलीसांत धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












