एफडीचे २६ अधिकारी अडचणीत, कार्यक्षेत्राबाहेर रेड मारणे भोवणार, सहा जणांच्या निलंबनाच्या कारवाईला मुख्यमंत्र्याकडून हिरवा कंदील ?

Foto
मुंबई : एफडीएच्या अधिकार्‍यांना पुणे आणि भिवंडीतली धाड टाकल्याचं प्रकरण भोवणार असल्याचं दिसून येत आहे. एफडीएच्या आणखी सहा अधिकार्‍यांचं निलंबन होण्याची शक्यता आहे. सहा जणांच्या निलंबनाच्या कारवाईला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवल्याचं सूत्रांच्या हवाल्याने समोर आलं आहे. एकूण २० अधिकार्‍यांची विभागीय चौकशी करून कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे समोर  आले आहे. कार्यक्षेत्राबाहेर धाडी टाकल्यानं एफडीएचे २६ अधिकारी अडचणीत आलेले आहेत.
 
दरम्यान सहा अधिकार्‍यांवर यापूर्वीच निलंबनाची कारवाई झाली आहे. आयुक्त तुकाराम मुंडे आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात फाईल पाठवलेली होती आणि आता मुख्यमंत्र्यांनी देखील कारवाई संदर्भात आता शिक्कामोर्तब केल्याचं समजंतय. तर आणखी सहा अधिकारी या प्रकरणी निलंबित होऊ शकतात एकूण २० अधिकार्‍यांची विभागीय चौकशी करून कारवाईचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
 एफडीएच्या एकूण २६ अधिकार्‍यांवरती याबाबत ठपका ठेवलेला होता. एबीपी माझाच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालेलं पाहायला मिळतंय. याप्रकरणामध्ये एकूण २६ अधिकारी जे आहे ते अडकलेले आहेत आणि आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सहा अधिकार्‍यांच निलंबन करण्यासाठी हिरवा कंदील दाखवलेल आहे आणि २० अधिकार्‍यांची विभागीय चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. 

एकूण २६ अधिकार्‍यांवरती ही कारवाई होणार आहे. पुणे आणि भिवंडीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये या अधिकार्‍यांनी आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर असताना सुद्धा रेड केलेली होती, रेड केलेली ही कंपनी  केंद्र सरकारच्या अंतर्गत येते, मात्र महाराष्ट्राच्या एफडीच्या अधिकार्‍यांनी ही रेड केलेली होती, आणि हे सगळं प्रकरण कोर्टापासून अगदी दिल्लीपर्यंत गेलेलं होतं आणि त्यानंतर आता ही कारवाई होताना दिसते आहे. ही टोबॅको कंपनी आहे, ही कंपनी केंद्र सरकारच्या अंतर्गत येते, मात्र एफडीएच्या अधिकार्‍यांना हे माहित असताना सुद्धा त्यांनी ज्या प्रकारे ही रेड केली ती अनाधिकृत होती त्यामुळे त्यांच्यावरती कारवाईचा ठपका ठेवण्यात आलेला होता.