छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने एनडीपीएस कायद्यांतर्गत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या २६० किलो ७९८ ग्रॅम अंमली पदार्थ नष्ट केला. या अंमली पदार्थांची अंदाजे किंमत ३७ लाख ६२ हजार ६४४ रुपये इतकी असून न्यायालयीन आदेशानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
केंद्रीय गोदाम तसेच एमआयडीसी सिडको, बेगमपुरा, सिटी चौक, एमआयडीसी वाळूज, छावणी, पोलीस दौलताबाद, जिन्सी, सातारा आणि हसूल ठाण्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचा यामध्ये समावेश होता. न्यायालयाकडून इन्व्हेंटरी
पंचनामा, प्रयोगशाळेचा आदेश प्राप्त न्यायवैज्ञानिक अहवाल आणि झाल्यानंतर या मुद्देमालाचा नाश करण्यात आला. नष्ट करण्यात आलेल्या अंमली पदार्थांमध्ये २६० किलो ११३ ग्रॅम गांजा, २१ ग्रॅम १५ मिलीग्रॅम एमडी पावडर आणि ६०४ ग्रॅम ६० मिलीग्रॅम चरस
यांचा समावेश होता. या मोहिमेत पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त मजहर सय्यद यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, पोलीस निरीक्षक गणेश मुंडे, पोलीस निरीक्षक गणपत राहिरे, सहायक पोलीस निरीक्षक रविकांत गच्चे, उपनिरीक्षक उत्रेश्वर मुंडे, पोह. नारायण पायघन, भाऊसिंग चव्हाण, छाया लांडगे, सतीष जाधव, देशराज मोरे, सरताज पठाण, विशाल मेटे यांनी सहभाग घेतला.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions













