नळ जोडण्यांचा आर्थिक भार मनपाच्या माथी; साताऱ्यातील ४ टाक्यांतही लवकरच पाणी
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहराची २,७४० कोटी रुपयांची पाणी योजना अंतिम टप्प्यात आली असून, नव्या योजनेत नळजोडण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. सध्या महापालिकेच्या दप्तरी १ लाख ३० हजार नळजोडण्या नोंद आहेत. नव्या योजनेत २ लाख ३२ हजार जोडण्या देण्याचे उद्दिष्ट असून, त्यापैकी ९० हजार जोडण्या कंत्राटदाराकडून दिल्या जाणार आहेत. मात्र, उर्वरित १ लाख ४२ हजार जोडण्या देण्याची जबाबदारी महापालिकेवर राहणार आहे. त्यामुळे योजनेत पाणीपुरवठ्याचा विस्तार होत असतानाच नळजोडण्यांसाठीचा आर्थिक भारही मनपाला पेलावा लागणार आहे. सध्या आठ टाक्यांमधून पाणीपुरवठा सुरू असून, आणखी दोन टाक्यांमध्ये पाणी
घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सातारा-देवळाईतील चार टाक्यांमध्येही लवकरच पाणीपुरवठा सुरू होणार आहे.
महापालिकेच्या दप्तरी २ लाख ३७हजार मालमत्तांची नोंद आहे. मात्र, नळ कनेक्शनची संख्या केवळ १ लाख ३० हजार एवढीच आहे. त्यामुळे अनधिकृत नळांची संख्या मोठी असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. यासंदर्भात महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले की, नव्या योजनेत एकूण नळांची संख्या २
लाखो लोकांना मिळणार दिलासा
▶ मनपाने गेल्या १० वर्षांत नो नेटवर्क भागात नळ कनेक्शन दिलेले गुंठेवारी भागात सध्या नाहीत. सातारा-देवळाईसह टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नव्या पाणी योजनेत नो नेटवर्क भागात सर्वाधिक नळ कनेक्शन दिले जाणार आहेत. एकूण १,९०० किलोमीटर लांबीच्या पाइपलाइनपैकी १,२०० किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून उर्वरित ७०० किलोमीटरच्या पाइपलाइनचे कामही याच 'नो नेटवर्क' भागातील शिल्लक आहे. नव्या पाणी योजनेत नो नेटवर्क भागालाही प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे पाणीटंचाईच्या झळा सहन करणाऱ्या इथल्या लाखावर नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
लाख ३२ हजार एवढी आहे. त्यातील ९० हजार नळ कनेक्शन देण्याची जबाबदारी कंत्राटदार कंपनीवर आहे. आतापर्यंत कंत्राटदाराने ४५ हजार नळ कनेक्शन्स दिले. उर्वरित कनेक्शन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (एमजीपी) देखरेखीखाली कंत्राटदार कंपनी देणार आहे. उर्वरित १ लाख ४२ हजार नळ कनेक्शन्स मात्र
महापालिकेलाच द्यावे लागणार असून, त्यासाठी महापालिकेने स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (एसओपी) तयार केली आहे. सातारा-देवळाई परिसरातील तयार टाक्यांमध्ये काही दिवसांत पाणी घेतले जाणार आहे. त्यानुसार या भागात महापालिकेतर्फे नळ कनेक्शनचे अर्ज वाटप सुरू करण्यात आले आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













