औरंगाबाद: बारावीचा निकाल लागताच सर्वत्र प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी गर्दी करत आहेत. मात्र फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया अद्यापही सुरु झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थी वर्गही प्रतीक्षा करत आहेत. यावर्षी राज्यभरातून बी फार्मसी अभ्यासक्रमाला सतरा हजार 230 जागासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
मागील तीन वर्षापासून फार्मसी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांना कल वाढत चालला आहे. मागील वर्षी देखील जागेच्या तुलनेत दुपटीने फार्मसी अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. याचा परिणाम यावर्षी अनेकांनी फार्मसी अभ्यासक्रम नव्याने सुरु करण्यासाठी यावर्षी प्रस्तावही दिले आहेत. त्यामुळे महाविद्यालयात भरही पडू शकते याशिवाय यावर्षी राज्यभरातील एकूण 229 फार्मसी अभ्यासक्रम महाविद्यालयांमध्ये एकूण 17 हजार 230 फार्मसीच्या जागा भरण्यात येणार आहे. तर विभागातून 43 महाविद्यालयांमध्ये एकूण 3 हजार 430 जागासाठी फार्मसी प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.
डी फार्मसीला 19 हजार 589 जागा
डी फार्मसी अभ्यासक्रमालाही विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. यावर्षी राबविण्यात येणार्या प्रवेश प्रक्रियेत डी फार्मसी अभ्यासक्रमाच्या राज्यभरातून 315 महाविद्यालयांमध्ये 19 हजार 589 जागा भरण्यात येणार आहे. तर विभागातील 70 महाविद्यालयांमध्ये 4 हजार 700 जागा भरण्यात येणार आहे.
















