सागर प्रकाशनचे साजवार्ता
Page No.: 6 Date: 19/11/2026
: छत्रपती संभाजीनगर,: जुन्या शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी महानगरपालिकेने कंबर कसली असून १९७५ च्या विकास आराखड्यानुसार जुन्या शहरातील ३१ रस्ते मोकळे करण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली असून, याचाच एक भाग म्हणून बुधवारी (दि. १८) अतिक्रमण हटाव
पथकाने गुलमंडी, औरंगपुरा, रंगारगल्ली आणि सिटी चौक परिसरात ध्वनिक्षेपकावरून संभाव्य कारवाईचा इशारा दिला.
या मोहिमेअंतर्गत दिवाण देवडी, रंगारगल्ली, सिटी चौक, गुलमंडी आणि औरंगपुरा यांसारख्या गजबजलेल्या भागातील अतिक्रमणे हटवून रुंदीकरण केले जाणार आहे. यापूर्वी २०१२ मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम
मार्किंगनुसार कारवाई
जुन्या शहरातील विकास आराखड्यातील रस्ते मोकळे करण्याच्या मोहिमेला लवकरच सुरवात होईल. बुधवारी पथकाकडून ध्वनिक्षेपकाद्वारे पूर्वसूचना देण्यात आली असून, आता आमचे कर्मचारी प्रत्यक्ष नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या भेटी घेतील. त्यानंतर नगर रचना विभागाच्या मार्किंगनुसार कारवाई केली जाईल.
संतोष वाहुळे, अतिक्रमण विभाग
संनियंत्रण अधिकारी.
भापकर यांनी अशी मोहीम राबवली होती. त्यानंतर माजी आयुक्त जी. श्रीकांत यांच्या काळात पैठण गेट परिसरात कारवाई सुरू झाली, मात्र ती एकाच रस्त्यानंतर थांबली होती. आता १४ वर्षांनंतर विद्यमान आयुक्त अमोल येडगे या रखडलेल्या मोहिमेला पुन्हा गती देणार आहेत. जुन्या शहरात दशकांपासून रस्ता रुंदीकरण न झाल्याने या भागात पायी चालणेही कठीण झाले आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions