जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे @ ३५९ रुग्ण

Foto

जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या बारा हजार पार

औरंगाबाद जिल्ह्यात आज दुपारनंतर २५६ रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर २४, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास १२५ आणि ग्रामीण भागात १०६ आढळलेले आहेत. आज दिवसभरात जिल्ह्यात एकूण ३५९ रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२०२५ झाली आहे. .
आज दिवसभरात शहरातील १३५, ग्रामीण भागातील ५८ असे एकूण १९३ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ६६९० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आजपर्यंत एकूण ४१४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण ४९२१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

ग्रामीण भागात १०७ रुग्ण

ग्रामीण भागात आणखी १०७ रुग्णांची भर पडली आहे. त्यात समतानगर, सिल्लोड १, औरंगाबाद १३, फुलंब्री ३, गंगापूर २४, खुलताबाद १, वैजापूर ५६, पैठण ९ या भागात रुग्ण आढळून आले आहेत. 
सिटी एंट्री पॉइंटवर २४ रुग्ण
पैठण १, गारखेडा १, चित्तेगाव ४, अजिंठा १, समृद्धी महामार्ग कर्मचारी १, रामचंद्रनगर १, वाळूज २, बजाजनगर ४, रांजणगाव २, वडगाव १, उस्मानपुरा १, शिवाजीनगर २, इतर ३ या भागात सिटी एंट्री पॉइंटवर २४ रुग्ण आढळून आले आहेत.

तीन कोरोनाबाधिताचा मृत्यू

घाटीत उमाजी कॉलनीतील ६५ वर्षीय स्त्री, खासगी रुग्णालयात बालाजी नगरातील ७२ वर्षीय रुग्ण आणि जुना बाजार येथील ६४ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.