दिवाळी सुटीत दररोज धावणार ३६ जादा बसेस

Foto
सागर प्रकाशनचे। साजवार्ता
Page No.: 6 Date: 25/10/2026
प्रवाशांचा प्रवास होणार सुखकर; महामंडळाचे विशेष नियोजन
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मूळ गावी जाणाऱ्या प्रवाशांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या (एसटी) छत्रपती संभाजीनगर विभागाने विशेष नियोजन केले आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आणि त्यांना प्रवासाचे अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातून दररोज ३६ जादा बसेस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणाच्या निमित्ताने शहरात राहणारे हजारो नागरिक दिवाळीच्या सणासाठी आपल्या मूळ गावी जातात. यामुळे सणाच्या दिवसांत मध्यवर्ती बसस्थानकासह सर्वच आगारांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळते आणि नियमित बस सेवेवर मोठा ताण येतो. ही परिस्थिती
कर्मचारी व्यवस्थापनाचे आव्हान
▶ दररोज ३६ जादा बसेस चालवण्यासाठी केवळ गाड्यांची उपलब्धता पुरेशी नसून चालक आणि वाहकांचे) योग्य नियोजन करणे हे एसटी प्रशासनासमोर मुख्य आव्हान असणार आहे. नियमित बस फेऱ्यांवर कोणताही प्रतिकूल परिणाम न होऊ देता अतिरिक्त बसेसचे नियोजन करण्याचे मोठे काम कर्मचाऱ्यांवर असेल. विभाग नियंत्रक प्रमोद आणि वाहतूक अधिकारी संतोष घाणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवासी सेवेचे सूक्ष्म नियोजन केले जात आहे.
हाताळण्यासाठी एसटी प्रशासनाने अतिरिक्त बसेस रस्त्यावर उतरवण्याची तयारी पूर्ण केली आहे.
प्रमुख मार्गांवर विशेष भर
एसटी विभागाच्या नियोजनानुसार नागपूर, अकोला, बुलढाणा, शेवगाव, पुणे, नाशिक, भुसावळ, येवला, धुळे, मालेगाव, जळगाव आणि नेवासा या सर्वाधिक मागणी असलेल्या मार्गांवर प्रामुख्याने या जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील सर्वच बस डेपोंमधून (आगारांमधून) गरजेनुसार या फेऱ्यांचे संचालन केले जाईल.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions