औरंगाबाद- जगातील तिसर्या आणि भारतातील सर्वोच्च असलेले
कांचनगंगा शिखर मराठवाड्यातील ४० ट्रेकर्संने सर
केले. के ३ नावानेही ओळखले जाणारे हे शिखर चढायला अतिशय कठिण
मानले जाते. चाळीस जणांमध्ये औरंगाबाद, परभणी, नांदेड आणि मुंबईमधील व्यापारी, डॉक्टर आणि शिक्षकांचा समावेश होता. हा ट्रेक सह्याद्री
ट्रेकर्स ग्रुपतर्फे डॉ. राजू सुरवसे, डॉ. चंद्रशेखर भालेराव आणि केदार खटिंग यांनी आयोजित केली
होती. बहुतांश जणांना अनुभव नसतांना इच्छाशक्तीच्या बळावर १७ हजार ८०० फूट उंचीचा शिखर
सर केला, अशी माहिती ट्रेकचे मार्गदर्शक तथा गजानन योगाचे
संचालक गजानन सराफ यांनी दिली.
सराफ म्हणाले की, आम्ही ट्रेकची तयारी मागील सहा महिन्यापासून सुरु केली होती. यामध्ये आम्ही वेगवेगळ्या शहरात पायर्या चढणे, उतरणे, योगाभ्यास करणे, प्राणायम आणि ध्यान यांचा सातत्याने सराव केला. त्यानंतर ९ नोव्हेंबरला आम्ही सिक्कीमकडे रवाना झालो. त्यानंतर ११ नोव्हेंबरला ट्रेकला सुरुवात झाली. ट्रेकदरम्यान आम्हा ४० लोकांचे सामान वाहण्यासाठी सहा याक, सात घोडे आणि १९ लोकांची टीम होती. पहिल्या दिवशी युक्सुम ते साचेन हे सात हजार हजार फूट उंच, तर दहा किलोमीटरचे अंतर पाच तासामध्ये पूर्ण केले. साधारणतः दररोज १० ते १५ किलोमीटरचा प्रवास आम्ही केला. प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर आम्ही १९ नोव्हेंबरला कांचनगंगा मोहिम फत्ते केली असे त्यांनी सांगितले.
यामध्ये डॉ. राजू सुरवसे, विशाल वट्टमवार, अमोल मेटे, अनिल नव्हाट, अनिल पटवे, भारत देवसकर, बी. चंद्रशेखर, दीपक चव्हाण, दीपक मोरे, दीपक तळेकर, दिनेश बोबडे, ज्ञानराज खटींग, गजानन मार्डीकर, गजानन सराफ, सनतकुमार जैन, गणेश निरस, हर्षद कन्नुवार, कैलास तिथे, डॉ. केदार खटींग, लक्ष्मीकांत
रापते, मयूर साळपुरीकर, ओम तलरेजा, पंढरीनाथ भंड, प्रभाकर टेकाळे, प्रमोद शिंदे, राजेश यादव, रामप्रसाद पवार, रविशंकर, नव्हाट, सचिन देशमुख, सचिन माळवतकर, सचिन शिंदे, सागर मोरे, संदीप मोरे, संतोष पालवे, शेखर इंगळे, शिवराज टेंगसे, तातेराव कदम, उत्तम वानखेडे, विकास वराळ, विलास वराळ आणि विठ्ठल सिसोदिया यांचा सहभाग होता.
’एव्हरेस्ट २०२० ’ मोहिमेची इच्छा
कांचनगंगा शिखर सर केल्यामुळे आम्हा सर्वांचेच मनोबल आता
वाढलेले आहे. त्यामुळे शारिरिक आणि मानसिक क्षमता समजतात. कोणत्याही ट्रेकमुळे
जगण्याची नवी उमेद मिळते. आता आम्ही ’एव्हरेस्ट २०२०’ मोहिम पूर्ण
करण्याचा प्रण आहे. त्यामुळे एवढ्यावर समाधान न मानता आम्ही एव्हरेस्ट सर करण्याची
तयारी सुरु करतोय. नक्कीच या मोहिमेतही आम्ही यशस्वी होऊ असा विश्वास आहे. -
योगशिक्षक, गजानन सराफ, औरंगाबाद










