मोठ्या संख्येने वारकऱ्यांची श्री विठ्ठल आश्रम दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ,
भक्ती, शिस्त आणि परंपरेचा अनोखा संगम
अलिम चाऊस
गंगापूर : विठ्ठल आश्रम दिंडीची ४३ वर्षांची अखंड परंपरा आहे. त्यामुळे १२०० वारकऱ्यांचा ३०० किमी पायी प्रवास, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि राज्यभरातून होणारे जल्लोषात स्वागत केले आहे. गंगापूर शहरात मंगळवारी सकाळी श्री विठ्ठल नामाचा गजर करीत श्री विठ्ठल आश्रम संस्थान ची पायी दिंडी जगतगुरू संत तूकाराम महाराजाच्या चरीत्राचे गाढे अभ्यासक ह भ प गूरूवर्य राऊत महाराज याच्यां नेतृत्वाखाली पंढरपूरकडे रवाना झाली अत्यंत शिस्तबंध असलेल्या या दिंडीत आठशे पुरुष् व चारशे महिला सहभागी झाल्या शहरातील नागरीकांनी डि जे व फटाकड्यांच्या आतसबाजीने करीत दिडीचे स्वागत केले.
नगराध्यक्ष संजय जाधव, उपनगराध्यक्ष अमोल जगताप, माजी नगरसेवक प्रदीप भैय्या पाटील, उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील, नगरसेवक ज्ञानेश्वर साबणे, रामेश्वर मुंदडा, संदेश गंगवाल, अवी पाटील, आबासाहेब शिरसाठ, कैलास साबणे, सुधाकर डबीर, नाना सोनवणे, चंद्रशेखर पाटील, संदीप साबणे, अशोक करडे, अरुण सागर, गोरख काळे, बापू पोकळे, पृथ्वीराज तोगे आंदिनी शिवाजी चौकात दिंडीचे स्वागत केले व अल्पोहार दिला.
दिंडी दुपारनंतर प महाराष्ट्रात प्रवेश करील मजलदर मजल करीत हि दिंडी ७ जुलै पंढरपूर येथे पोहेचेल दिंडीचा मुक्काम चार दिवस श्री विठ्ठल आश्रम पंढरपूर येथे राहील या कालखंडात वारकऱ्यांना मुत्त पणे श्री विठ्ठलाचे दर्शन घडनार आहे. गंगापूर शहर आज अर्थाने विठ्ठल नामाने दुमदुमून गेले सर्व वारकऱ्यानां शुद्ध पाणी व औषध उपचाराची व्यवस्था करण्यात आली.
याप्रसंगी नगरसेवक संतोष अंबिलवादे, माजी संचालक संदीप साबणे, दीपक साबणे, अरुण पाटील, दिपक साळवे, यांनी दिंडीचे स्वागत करून रवाना केले.
-- मेंढ्यांच्या रिंगणाचा सोहळा --
तुकाराम महाराजांच्या दिंडीप्रमाणे रामभाऊ महाराजांच्या दिंडीला भव्य असे मेंढ्यांच्या रिंगणाचा सोहळा आषाढी एकादशी निमित्त गंगापूर ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यात गंगापूर शहरांमध्ये श्री विठ्ठल आश्रमचे वारकरी मंगळवारी सकाळी ७: वाजता पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. गाथामूर्ती मठाधिपती रामभाऊ महाराज राऊत यांच्या नेतृत्वाखाली ४३ वर्षांची ही अखंड परंपरा यंदाही भक्तिभावात सुरू झाली.या दिंडीचे रस्त्याने ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले.