गंगापूर, (प्रतिनिधी) तालुक्यातील अगरकानडगाव शिवारातील कपाशीच्या शेतात गांजासदृश झाडांची लागवड केल्याचा प्रकार गंगापूर पोलिसांनी उघडकीस आणला. रविवार, १८ ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता पोलीस व महसूल विभागाने संयुक्त कारवाई करून ४४ झाडे जप्त केली.
या झाडांचे एकूण वजन ५९. ६८ किलो असून, त्यांची किंमत ५ लाख ९६ हजार ८०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी कानडगाव येथील संजू नामदेव बर्डे (वय ५५) यांच्याविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या झाडांचे नमुने न्यायवैद्यक तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. पोलीस उपनिरीक्षक विश्वजित फरताडे यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.
या कारवाईत पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, पोलीस उपनिरीक्षक विश्वजित फरताडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल
गंगापूर पोलिसांनी उघडकीस आणला. अगरकानडगाव शिवारात महसूल विभागाच्या सहकार्याने संयुक्त कारवाई करून गांजासदृश ४४ झाडे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. जप्त केलेल्या झाडांचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.
विजय पाखरे, पोलीस अंमलदार मनोज नवले, अनिरुद्ध शिंदे, कैलास राठोड, अर्जुन सिंगल, अजित नागलोड, तसेच होमगार्ड सूरज गायकवाड, विठ्ठल पवार, प्रकाश आघाडे, करण साळुंके, बबलू लगड, रामेश्वर मंडलिक
सलीम चाऊस, पोलीस निरीक्षक, गंगापूर आणि सचिन प्रधान सहभागी झाले. महसूल विभागाच्या मंडळ अधिकारी मीना सुकटे, तलाठी, शासकीय पंच, वजनमाप कर्मचारी आणि गंगापूर येथील न्यायवैद्यक शास्त्र पथकानेही कारवाईत सहभाग घेतला.