धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदान; अनिल गोटे यांचे गंभीर आरोप

Foto
धुळे : वोट चोरीवरून काँग्रेस देशभरात वातावरण तापवत असताना आता धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून मोठा दावा केला जात आहे. माजी आमदार अनिल गोटे यांनी धुळ्यात विधानसभा निवडणुकीत ४५ हजार बोगस मतदारांनी मतदान केल्याचा दावा केला आहे. 

अनिल गोटे यांनी मतदार यादीच आणली आहे. यात त्यांनी एकाच नावाचे अनेक लोक मतदार असल्याचे दाखविले आहेत. एवढेच नाही तर बोगस मतदान करून घेण्यासाठी बीएलओंना प्रत्येकी २० हजारांची आगाऊ रक्कम देण्यात आली होती, असाही आरोप केला आहे. 

विधानसभेच्या निवडणुकीत धुळे शहर विधानसभा मतदारसंघात तब्बल 45 हजार बोगस मतदारांनी मतदान केले असून 27 हजार मतदान एकाच नावाच्या कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त पाच सहा अशा सत्तावीस हजार बोगस मतदारांची यादी आपल्या हाती लागल्याचा आरोप गोटे यांनी केला आहे. तसेच याबाबत आपण तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची साधी चौकशीही करण्यात आली नसल्याचा गंभीर आरोप गोटे यांनी केला आहे.