विद्यापीठात सोमवारपासून दोन दिवस परीक्षा; ३ केंद्रांवर आयोजन
छत्रपती : संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) डॉ.
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एकत्रित वेतनावर १४१ प्राध्यापकांची भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी प्राप्त झालेल्या ४६८ उमेदवारांच्या अर्जाच्या आधारे सोमवारी (दि.३) आणि मंगळवारी (दि.४) दोन दिवस लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली. विद्यापीठ परिसरातील
संगणकशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र आणि ज्ञान स्रोत केंद्र या तीन मुख्य केंद्रांवर एकूण सात सत्रांमध्ये ही परीक्षा पार पडणार आहे.
विद्यापीठात शिक्षक प्रवर्गातील २८९ शासन मान्य पदे असून १६० पदे सध्या रिक्त आहेत. अध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक प्रवर्गातील ७३ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली. एकत्रित निधीतून वेतनावर विविध ५६ विभागांत शिक्षकांची १४१ पदे भरण्यात
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
येणार आहेत. ३० जून ते १५ जुलै या काळात ऑनलाइन अर्ज मागविले होते. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन वर्षांत एकत्रित वेतनावर शिक्षकांची ११ महिन्यांसाठी भरती केली होती. आता २०२६-२७
या शैक्षणिक वर्षासाठी एकत्रित वेतनावर सहायक प्राध्यापकांची १४१ पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील ३० विभाग, धाराशिव उपपरिसर येथील ७ विभाग व दीनदयाल उपाध्याय कौशल्य केंद्र अशा ३८ विभागांत ५६ जागांसाठी एकूण १४१ पदे भरण्यात येणार असून या शिक्षकांना ३२ हजार रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे. मागवलेल्या अर्जातून यातील ४६८ उमेदवार पात्र ठरले आहेत.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












