जवळचे विसर्जनस्थळ शोधण्यासाठी क्यूआर कोड; मनपा आयुक्त येडगे यांची पाहणी
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो):
गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि नागरिकांसाठी सुलभकरण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. शहरातील विविध विसर्जन कुंड आणि कृत्रिम तलावांची मंगळवारी मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सुविधा आणि सुरक्षा व्यवस्था तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. नागरिकांना आपल्या परिसरातील मूर्तीदान संकलन केंद्र तसेच जवळचे विसर्जनस्थळ सहज शोधता यावे, यासाठी विशेष क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध करून देण्याचेही त्यांनी निर्देश दिले.
शहरातील विविध भागांत यंदा एकूण ४७ मूर्तीदान संकलन केंद्रे उभारण्यात येणार आहेत. नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याऐवजी या केंद्रांवर जमा कराव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या केंद्रांवर जमा होणाऱ्या गणेशमूर्तीचे विधिवत पूजन करून औपचारिक
विसर्जन करण्यात येणार आहे. त्यानंतर या मूर्ती मूर्तिकारांकडे सुपूर्द केल्या जाणार आहेत. सुरक्षेला प्राधान्य विसर्जनस्थळी नागरिकांची गर्दी लक्षात घेता पुरेशी प्रकाशव्यवस्था, सुरक्षा व्यवस्था आणि आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना आयुक्त येडगे यांनी दिल्या. विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये, तसेच रात्रीच्या वेळीही सुरक्षितपणे विसर्जन करता यावे, यासाठी प्रकाशव्यवस्था अधिक सक्षम करण्याचे निर्दे श देण्यात आले.
आवश्यक बाबींचा आढावा
आयुक्त येडगे यांनी मंगळवारी जिल्हा परिषद मैदानातील विसर्जन कुंड, सिडको एन-१२ (हडको एन-१२) येथील विसर्जन कुंड, राजीव गांधी स्टेडियम परिसरातील कृत्रिम तलाव, शिवाजीनगर येथील विसर्जन कुंड तसेच देवळाई तलाव परिसरात सुरू असलेल्या तयारीची पाहणी केली. संबंधित ठिकाणांवरील सुविधा, प्रकाशयोजना, सुरक्षा व्यवस्था आणि इतर आवश्यक बाबींचा त्यांनी आढावा घेतला.
क्यूआर कोडद्वारे माहिती
नागरिकांना विसर्जनासाठी योग्य ठिकाण शोधणे सोपे व्हावे, यासाठी क्यूआर कोडच्या माध्यमातून मूर्तीदान केंद्रे आणि विसर्जनस्थळांची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या जवळचे केंद्र किंवा विसर्जनस्थळ सहजपणे शोधता येणार आहे. या पाहणीवेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, शहर अभियंता संजय कोंबडे, अतिरिक्त शहर अभियंता अमोल कुलकर्णी यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मूर्ती केंद्रात जमा करा
शहरातील विविध ठिकाणी एकूण ४७मूर्तीदान संकलन केंद्रे स्थापन करण्यात येत आहेत. नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जास्तीत जास्त गणेश प्रतिमा या केंद्रांवर जमा कराव्यात.
- अमोल येडगे, मनपा
आयुक्त
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solut















