दिवाळीआधी ५ हजार खात्यात जमा होणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

Foto
मुंबई : राज्यातील ३०५ तालुक्यांत दुष्काळाची परिस्थिती आहे. शेतकर्‍यांची दिवाळी संकटात जाईल, याची राज्य शासनाला कल्पना आहे. त्यामुळेच शेतकर्‍यांना अग्रीम मदत म्हणून सरकारकडून ५ हजार रूपये दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. दिवाळीपूर्वीच शेतकर्‍यांच्या खात्यात ५ रूपये जमा केले जातील, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत दुष्काळाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
राज्यावर दुष्काळाची भीषण छाया आहे. पाऊस न पडल्याने शेतकर्‍यांच्या पिकांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पशुधन सांभाळणे देखील जिकीरीचे झाले आहे. परंतु शेतकर्‍यांनी खचून जाऊ नये. सरकार बळीराजाच्या पाठीशी आहे.
दुष्काळाच्या अनुषंगाने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले आहेत. मराठवाड्यात पाण्याची पातळी ३ मीटरपेक्षा खाली गेली आहे. त्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबरपासून पाण्याचे टँकर दिले जातील. त्याचे  ट्रॅकिंग होईल. मागे १६ हजार बेकायदेशीर पाण्याचे कनेक्शन ज्यांनी घेतले, त्यांचे पाण्याचे कनेक्शन कापण्यात आले आहेत.

निर्णय थोडा कठोर निर्णय असला तरी पिण्याचे पाणी राखून ठेवणं गरजेचे आहे.
महत्त्वाचे म्हणजे शेतकर्‍यांना अग्रीम मदत म्हणून दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. दुसरीकडे कर्जमाफीचे पैसेही शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाले आहेत. बळीराजाला शक्य तितका दिलासा देण्याचे काम सरकारकडून सुरू आहे.