५० लाखांची फसवणूक; १८ जणांवर सिटीचौक ठाण्यात गुन्हा

Foto
छत्रपती संभाजीनगर,ः (सांजवार्ता ब्युरो बनावट करारनामे व जुन्या तारखेचे बाँड पेपर वापरून एका वकिलाच्या मालकीची १७ गुंठे जमीन हडपण्याचा आणि ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी १८ जणांविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात फसवणूक आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानपुरा येथील रहिवासी व वकील सुशील मुरलीधर बियाणी यांची मौजे सावंगी येथे २३१/१ मध्ये १७ गुंठे जमीन आहे. या जमिनीच्या फेरफाराबाबत माहिती मिळताच बियाणी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले असता, आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी संगनमत करून जुन्या तारखेचे बनावट दस्तऐवज तयार केल्याचे उघडकीस आले. आरोपींनी जमिनीचे दोन भाग करून ती स्वतःच्या मालकीची असल्याचे भासवत बियाणी यांची ५० लाखांची फसवणूक केली. एवढेच नव्हे तर, "या जमिनीवर पुन्हा पाऊल ठेवले किंवा बांधकामात अडथळा आणला तर तुला जीवे मारून तेथेच गाडून टाकू," अशी धमकी आरोपींनी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. सुशील बियाणी यांच्या फिर्यादीवरून सय्यद इर्शद अली जैदी, सरफराज जैदी, नौशाद अली जैदी यांच्यासह एकूण १८ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे करत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions