छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): खाम नदी पात्राचे सौंदर्य आणि स्वच्छता अबाधित महानगरपालिकेने राखण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला असून, गुरुवारी बेगमपुरा स्मशानभूमी परिसरातील बेकायदा बांधकामांवर प्रशासनाचा हातोडा पडला. नदी पात्रात विनापरवाना थाटण्यात आलेले ६ म्हशींचे गोठे आणि भंगाराचे मोठे गोडाऊन मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने जमीनदोस्त केले. कारवाई दरम्यान गोठे मालकांनी महापालिकेच्या पथकाला कडाडून विरोध करत अडथळा
JCB
बेगमपुरा परिसरात गोठे आणि गोडावून जमीनदोस्त करण्यात आले. (छाया : सचिन भंडारे)
निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी आणि मनपा कर्मचाऱ्यांनी या विरोधाला न
जुमानता नदीपात्र अतिक्रमणमुक्त केले.
अनेक वर्षांपासून बेगमपुरा
असलेल्या स्मशानभूमीजवळ खामनदी पात्रात सहा म्हशीचे गोठे आणि एक भंगारचे गोडाऊन थाटण्यात आले होते. पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतरच म्हशी दुसरीकडे घेऊन जात होते. सध्या खामनदीचे सौंदर्याकरण व सुशोभीकरण आणि रुंदीकरण केले जात आहे. या कामामध्ये म्हशीचे गोठे आणि गोडाऊन अडथळा ठरत असल्याचे निदर्शनास आले. मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने म्हशीच्या गोठे मालकांना गोठे स्थलांतरित करण्याची नोटीस बजावली होती.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













