सांजवार्ता
Dage 28/11/2026
आरोग्य
१० ते १६ वयोगटातील ७ रुग्णांना मिळणार नवी वाचा
जीभ चिकटलेल्या सात रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया
महागड्या शस्त्रक्रिया होणार मोफत
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत अनेक प्रकारचे कार्यक्रम सुरू आहे. शाळा, अंगणवाडीमधील ० ते १८ वर्षांच्या बालकांसाठी ही योजना आहे. यामधे हार्ट सर्जरी, कॉक्लियर इम्प्लांटसारख्या महागड्या शस्त्रक्रिया आता योजनेतून होत आहे. जिल्हा रुग्णालय येथे संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत बडे यांनी केले आहे.
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) आणि डीईआयसी अंतर्गत जिल्हाभरात राबवण्यात येत असलेल्या आरोग्य तपासणी मोहिमेत मोठा दिलासा मिळाला आहे. शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी जिल्हा रुग्णालयात चिटकलेली जीभ (टंग
टाय) असलेल्या ७ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. १० ते १६ वयोगटातील या मुलांना बोलताना येणारा अडथळा आता दूर होणार असून, तोतरेपणा कमी होऊन त्यांना स्पष्ट वाचा मिळाल्याचे समाधान लाभले आहे.
जिल्ह्यात शेतकरी, मजूर कामगार यांना
खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करताना खर्चाची भीती असल्याने ते व्यंग दाखवत नाही. त्यामुळे आता घरोघरी आणि शेतवस्तीवर तपासणी सुरू असल्याने अनेकांना मोफत योजनेचा लाभ मिळत आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर
मुदखेडकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत बडे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे नियोजन करण्यात आले.
सर्जन डॉ. मुजफ्फर मनियार, डॉ. संतोष बटुळे, डॉ. मुजीब, डॉ. शिंदे प्रशांत, डॉ. स्नेहा नीलावाड, भूलतज्ञ डॉ. अर्चना वसुकर, डॉ. संजय चव्हाण, डॉ. प्रवीण बोडेवार, आरबीएसके समन्वयक विकास मेश्राम, डीईआयसी नोडल अधिकारी डॉ. सोनखेडकर, विलास राजपूत, शुभम चाटे, सिस्टर विद्या ढेपले, अधिसेविका शुभांगी थोरात, शस्त्रक्रियागारामधील पारिसेविका अनिता जारवाल, सिस्टर रश्मी चौधरी, माधुरी वानखेडे, रेखा वाघमारे व इतर अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions















