कॅनरा बँकेत नकली सोने ठेवून ७ कोटींचा डल्ला
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): कॅनरा बँकेच्या शाखेत चक्क बँक अधिकाऱ्यांनीच तब्बल ७ कोटी ३२ लाख रुपयांचा दरोडा टाकल्याचा धक्कादायक प्रकार बदनापूर (जि. जालना) येथील शाखेत उघडकीस आला. नकली सोन्याचे दागिने गहाण ठेवून या अधिकाऱ्यांनी बँकेची रक्कम हडपली. या प्रकरणी पोलिसांनी शाखा व्यवस्थापक विजेंद्र पाटणकर, कर्ज अधिकारी संजय डोंगरे, सुवर्ण मूल्यमापक प्रवीण बुन्हाडे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यातील पाटणकर आणि बुन्हाडे या दोघांना बदनापूर पोलिसांनी अटक केली तर डोंगरे फरार झाला.
अधिकारी सीसीटीव्हीत कैद
▶ तपासणीची कुणकुण लागताच कर्ज अधिकारी संजय डोंगरे हा आता आपले बिंग फुटणार या भीतीपोटी २३ एप्रिल रोजी सकाळी ११.२० वाजता बँकेच्या स्ट्रॉग रूममध्ये गेला. तेथून बरीच पाकिटे काढून तो घेऊन गायब झाला. सीसीटीव्ही तपासणीत ही बाब समोर आली आहे. डोंगरे हा तेव्हापासून गायब असून, शाखा व्यवस्थापक पाटणकर व सुवर्ण मूल्यमापक बुन्हाडे हे मात्र पोलिसांच्या हाती लागले.
च्या बँके धोरणानुसार सुवर्ण कर्जाच्या पाकिटांचे त्रैमासिक पुनर्मूल्यांकन सुरू असताना हा घोटाळा समोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ एप्रिल रोजी बँकेचे सहाय्यक महाव्यवस्थापक केशवमूर्ती बी.व्ही. यांच्या उपस्थितीत तपासणी सुरू असताना बँकेत सोने तारण कर्ज अंतर्गत आला.
सोन्याची ३० पाकिटे गायब
▶ विशेष म्हणजे बँकच्या स्ट्रॉग रूममधील ३ कोटी ५२ लाख रुपये किमतीची सोन्याची ३० मूळ पाकिटे गायब असल्याचेही समोर आले. त्यावरून बनावट सोने तारण ठेवून बोगस कर्जदारांच्या नावावर बँकेतून ७कोटी ३२ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले. चौकशीत ही कृत्य कर्ज वितरण अधिकारी संजय डोंगरे याने शाखा व्यवस्थापक विजेंद्र पाटणकर व सुवर्ण मूल्यमापक प्रवीण बुन्हाडे या तिघांनी मिळून केल्याचे उघडकीस आले. त्यावरून बदनापूर पोलिस ठाण्यात शनिवारी फिर्याद दिली. बँकेचे सहायक व्यवस्थापक केशव मूर्ती यांनी त्यानुसार तिन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल पोलिस निरीक्षक एस.टी. सुरवसे हे करीत आहे. अधिक तपास बदनापूर पोलिस करीत आहेत.
तारण ठेवलेल्या दागिण्यांच्या काही सीलबंद पाकिटांमध्ये चक्क बनावट सोने आढळले. त्यानंतर सखोल चौकशी केली असता येथील एकूण २२ कर्ज पाकिटांमध्ये असलेले ३ कोटी ७९ लाख रुपये किमतीचे सोने हे बनावट असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली.













