खेळणा मध्यम प्रकल्पातून अवैध पाणी उपसा ७ इलेक्ट्रिक मोटारी केल्या जप्त

Foto
सिल्लोड नगरपरिषदेने केली पुन्हा धडक कारवाई

सिल्लोड, (प्रतिनिधी) शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड नगर परिषदेकडून अवैध पाणी उपसा करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरूच असून, खेळणा मध्यम प्रकल्प परिसरात पुन्हा एकदा कारवाई करत ७इलेक्ट्रिक मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे याच परिसरात दोन दिवसांपूर्वीही नगर परिषद प्रशासनाने कारवाई केली होती.

नगर परिषदेकडून वारंवार सूचना व आवाहन करूनही काही व्यक्तींकडून अवैधरित्या पाण्याचा उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने ही कारवाई करण्यात आली. पाणीटंचाईच्या काळात अशा प्रकारे होणारा अवैध पाणी उपसा शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम करणारा ठरत असल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. 

जप्त करण्यात आलेल्या मोटारींसह संबंधित अवैध पाणी उपसा करणाऱ्यांची माहिती संकलित करण्यात येत असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. 

यावर्षी पावसाने अद्याप अपेक्षित हजेरी लावलेली नसल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत जलस्रोतांचे संरक्षण करणे ही सर्वांची सामूहिक कारवाई टाळण्यासाठी नियमांचे पालन करावे
अवैध पाणी उपसा करणे हा गुन्हा असून, सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार जप्तीसह गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. 

शेतकऱ्यांनी नगर परिषदेस सहकार्य करावे. अवैध पाणी उपसाविरोधातील मोहीम यापुढेही सुरू राहणार असून, होणारी कारवाई टाळण्यासाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपमुख्याधिकारी अजगर पठाण यांनी केले आहे.

जबाबदारी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या कारवाईदरम्यान उपमुख्याधिकारी अजगर पठाण, प्रशासकीय अधिकारी मधुकर साळवे, स्वच्छता निरीक्षक अन्वर पठाण, पाणीपुरवठा विभागाचे आजीम शेख व इतर कर्मचारी उपस्थित होते.