गंगापूर येथे रक्तदान शिबिरात ७१ जणांचे रक्तदान

Foto
ऐन तुटवड्यात घाटीच्या रक्तपेढीला मिळाला दिलासा

गंगापूर (प्रतिनिधी) : सध्या सुट्या  आणि उन्हाची तीव्रता यामुळे रक्तदानाचे - प्रमाण घटले आहेत. यादरम्यान गंगापूर येथे - रक्तदान शिबिरात ७१ जणांचे रक्तदान झाले. यामुळे ऐन तुटवड्यात घाटीच्या रक्तपेढीला न दिलासा मिळाला. स्व. अनिकेत काळे यांच्या च स्मृतीप्रित्यर्थ जन्मदिनानिमित्त डॉ. प्रशांत न पंडूरे यांनी रक्तदान शिबीर आयोजित केले होते.
शिबिराचे उदघाटन आशुतोष काळे,  उपनगराध्यक्ष अमोल जगताप, नगरसेवक अजित राजपूत, नवनाथ कानडे, आनंद पाटील, डॉ. प्रशांत पोपटराव पंडुरे, गोरख चोरमारे, हनुमान काळे, अशोक तिखे, विजय राजपूत, संदीप माघाडे, सिद्धार्थ  खाजेकर, आशिष साबणे, राजु खोसे, असिफ शेख, अभिषेक चव्हाण, लक्ष्मण इंगळे, ऋतिक कबाडे, प्रसाद सुर्यवंशी, डॉ. विलास गायकवाड, डॉ. अमित गुंजाळ, डॉ. श्रीनिवास तौर आदींसह मित्रपरिवार उपस्थित होते. घाटी रक्तपेढीतर्फे बीटीओ डॉ. ओमकार अंचेवाड, समाजसेवा अधीक्षक अनुसया घोगरे यांनी सहकार्य केले.