छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): जिल्ह्यातील अवैध धंद्यांचा नायनाट करण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी एकाच रात्रीत मोठी कारवाई केली आहे. पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मझिरो टॉलरन्सफ धोरणांतर्गत राबवलेल्या ऑपरेशन ऑल आऊटमध्ये तब्बल ७७ सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. या धडक कारवाईत पोलिसांनी २ कोटी ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत गुन्हेगारांचे कंबरडे मोडले आहे.
या कारवाईत वाळूमाफिया, अवैध दारू विक्रेते आणि गोवंश तस्करांवर कारवाई करत २ कोटी ३२ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अपर पोलिस अधीक्षक, सर्व उपविभागीय अधिकारी आणि ठाणे प्रभारींच्या नेतृत्वात शनिवारी (दि.२०) संध्याकाळी ६ ते रविवारी पहाटे ६ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्याभरात हे मऑपरेशन ऑल आऊटफ आणि कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले.
अवैध धंद्यांविरुद्ध झिरो टॉलरन्स
हातभट्टी अड्ड्यांवर धाड
हातभट्टी दारू तयार करणाऱ्या ९ आरोर्पीना अटक करत २० हजार रुपयांचे १,११० लिटर रसायन व साहित्य नष्ट केले. तर विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या ३१ जांवर गुन्हे दाखल करत ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच जुगार खेळणाऱ्या २० आरोर्पीना ताब्यात घेऊन ५ लाख ३८ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२४ गोवंशाची सुटका
धातकी शस्त्रे बाळगून दहशत माजवणाऱ्या दोन जणांवर आर्म अॅक्टनुसार कारवाई करत २ गावठी कट्टे, ४ जिवंत काडतुसे आणि १ तलवार जप्त करण्यात आली आहे. गोवंश तस्करी व कत्तलीविरुद्ध २ गुन्हे दाखल करून ३ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यात १२ लाख ८४ हजारांचे १२० किलो गोमांस जप्त करून २४ गोवंश जनावरांची सुटका करत त्यांना गोशाळेत पाठवले आहे. यासोबतच प्रतिबंधित गुटख्याची चोस्टी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करत १२ लाख ३० हजारांधा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
११ वाहने जप्त, १२ जणांचे लायसन्स रद्द
अवैध वाळू तस्करी, गौण खनिजाची चोरी व अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध ८ गुन्हे दाखल करून तब्बल १ कोटी २८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल आणि ११ वाहने जप्त केली आहेत. याशिवाय, यापूर्वीच्या गुन्ह्यांतील ६० वाहने व १२ चालकांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाठवला असून, जप्त केलेल्या ११ वाहनांच्या निलंबनाचे आदेशही दिले आहेत.
कठोर कारवाई सुरूच राहणार
६ या विशेष मोहिमेत एकूण ७३ - गुन्हे दाखल करत ७७ आरोपींवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. भविष्यातही अशाच प्रकारे नाकाबंदी आणि कॉम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून असामाजिक घटकांवर कठोर कारवाई केली जाईल.
- प्रकाश जाधव, पोलिस अधीक्षक
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













