मुकुंदवाडीत जुगार खेळणारे 8 जण अटकेत

Foto
 पत्त्यावर पैसे लाऊन तिरर्ट नावाचा जुगार खेळणार्‍या आठ जुगार्‍याना मुकुंदवाडीतुंन  गुन्हेशाखेच्या पथकाने छापा टाकून अटक केली आहे.त्यांच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य आणि 35 हजाराची रोख जप्त करण्यात आली आहे.
नितीन रावसाहेब गायकवाड, दिलीप भीमराव हजबद, तात्याराव भीमराव डिडोरे,विठ्ठल कारभारी शेलार,ज्ञानेश्वर बाबासाहेब शिंदे, निवृत्ती नाथराव खैरे,सदाशिव रघुनाथ शेलार,,गणेश बाबासाहेब कुर्हे (सर्व राहणार, जयभवाणीनगर, मुकुंदवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आठ जुगार्‍याची नावे आहेत. 
मुकुंदवाडी परिसरातील हनुमान मंदिरामागे आरोपी नितीन गायकवाड हा जागा उपलब्ध करून देत जुगार चालवत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्याने संध्याकाळी 8 वाजेच्या सुमारास पथकाने छापा टाकला असता सर्व आरोपीतोंडाला मास्क न लावता पत्त्यावर पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळत असताना मिळून आले. पोलिसांनी या आठही आरोपीना अटक करून त्यांच्या ताब्यातून जुगार खेळण्याचे साहित्य व 34 हजार 340 रुपये रोख जप्त केले असून यांच्या विरोधात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास साहायक फौजदार कौतिक गोटे करीत आहेत.