छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणातील ८५९ पैकी ८४२ जणांनीच आपला निवडणूक खर्च सादर केल्याचे समोर आले आहे. उर्वरित उमेदवारांनी अद्याप आवश्यक कागदपत्रे जमा न केल्याने प्रशासनाकडून त्यांना नोटीस पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
मनपा निवडणुकीनंतर प्रत्येक उमेदवाराने आपला खर्च निर्धारित नमुन्यात सादर करणे बंधनकारक होते. राज्य निवडणूक आयोगाच्या आदे-शानुसार चार स्वतंत्र नमुना प्रपत्रांमध्ये खर्चाचा तपशील देणे आवश्यक करण्यात आले होते. मात्र निवडणुकीच्या कालावधीत कोणत्याही उमेदवाराने खर्चाचा तपशील सादर केला नव्हता. त्यानंतर निवडून आलेल्या ११५ नगरसेवकांसह सर्व पराभूत उमेदवारांना १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.
या मुदतीत ८४२ जणांनी खर्चाचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या कार्यालयात जमा केला आहे. तर काही पराभूत उमेदवारांनी अद्यापही खर्चाचा तपशील सादर केलेला नसल्याचे समोर आले आहे. संबंधितांना लवकरच नोटीस बजावण्यात येणार असून, त्यानंतरही माहिती न दिल्यास त कायदेशीर कारवाईचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.














