ऐन दिवाळीत दोन भीषण अपघातात 9 ठार, मृतांमध्ये बाप, मुलगा आणि भाविकांचा समावेश

Foto
नंदूरबार : राज्यात दोन भीषण अपघातांनी 9 जणांचा बळी घेतला. नंदुरबार येथील अस्तंबा यात्रेहून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपला अपघात होऊन 6 जणांचा मृत्यू झाला. तर समृद्धी महामार्गावर वाशिमजवळ इनोव्हा कार डिव्हायडरला आदळून 3 जण ठार झाले. सणासुदीच्या काळात झालेल्या या अपघातांमुळे आनंदावर दु:खाचे सावट पसरले आहे.

दिवाळीला सुरूवात झाली आहे, आज धनत्रयोदशीचा सण आहे. सणानिमित्त राज्यात, लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण असून फराळ, खरेदी, फटाके विकत घेणं यामुळे मोठी गर्दी असून सगळीकडे आनंदी वातावरण आहे. मात्र याच समाला, आनंदाला गालबोट लागलं आहे , त्याच कारण म्हणजे राज्यात 2 भीषण अपघातांमध्ये एकूण 9 जण ठार झाले आहेत. नंदुरबार- अस्तंबा यात्रेवरून परत येणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे, भाविकांच्या पिकअप ट्रकला अपघात होऊन 6 जण मृत्यूमुखी पडले. तर दुसरीकडे समृद्धी महामार्गावर वाशिमजवळ इनोव्हा कारच्या भीषण अपघाता झाला असून त्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दोन्ही अपघातांमुळे हळहळ व्यक्त होत असून अनेक जण जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सणासुदीच्या काळात अपघातांचे सत्र सुरूच असून अनेक निष्पाप नागिरकांना जीव गमवावा लागल्याचे समोर आले आहे. नंदूरबार अस्तंबा यात्रेवरून परत येणाऱ्या भाविकांवर काळाने झडप घातली. यात्रेहून परत येणाऱ्या भाविकांच्या पिकअप गाडीला अपघा झाला. चांदशैली घाटात वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला, त्यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.तर 10 पेक्षा अधिक भाविक गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

अपघात स्थळी भयानक दृश्‍य असून तिथे मदत कार्य सुरू आहे. जखमींना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्याची कार्यवाही सुरू असून तिथे उपचार करण्यात येतील. अपघाताचे वृत्त समजताच पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.

समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात मान्यमार मधील 3 ठार, 5 जखमी


दरम्यान वाशिम जिल्ह्यातील मालेगांव ते जउळका रेल्वे दरम्यानच्या समृद्धी महामार्गावरील डव्हा पेट्रोल पंप जवळ रात्री अडीच वाजता च्या दरम्यान भीषण अपघात घडला आहे. मुंबई वरून नागपूर च्या दिशेने जाणाऱ्या कार वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव असलेली कार थेट डिव्हायडरवर जाऊन आदळली, 3 ठार झाले. यात म्यानमार या देशातील 6 जणांच्या एकाच कुटुंबातील 40 वर्षीय वडील आणि 13 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला तर 63 वर्षीय आजोबा गंभीर जखमी आहेत. आणखीही एका व्यक्तीचा दुर्दैवाने मृत्यू झाला. तर या भीषण अपघातात कुटुंबातील आई,मावशी मामा आणि चालक असे 4 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघात ग्रस्त कार मधील कुटुंब मुंबई वरून जगनाथ पुरी येथे जात होते, असे समजते.या अपघाताची तीव्रता एवढी होती की त्यात कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.

पुणे-नाशिक महामार्गावर चाकणजवळ भीषण अपघात


दरम्यान पुणे-नाशिक महामार्गावर चाकणजवळही भीषण अपघात झाला. झगडेवस्ती परिसरात भरधाव खासगी बस चालकाचा ताबा सुटून बस दुभाजक फोडत विरुद्ध लेनमध्ये गेली आणि तीन दुचाक्या तसेच एका मोटारीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले असून सर्वांना चाकणमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने मोटारीतील प्रवासी बचावले. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून तो मध्यधुंद अवस्थेत होता अशी माहिती समोर आली आहे.