सिल्लोड (प्रतिनिधी) : सिल्लोड येथील आमदार अब्दुल सत्तार यांचे जनसंपर्क कार्यालय शिवसेना भवन येथे लोकराजा, राजर्षी, छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधत आमदार सत्तार यांनी जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव तायडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन अर्जुन गाढे, शिवसेना शहरप्रमुख मनोज झंवर, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, न.प.तील शिवसेनेचे गटनेते सुधाकर पाटील, नगरसेविका राजश्री निकम, नगरसेवक सुधाकर गायकवाड, शिवसेना पदाधिकारी किशोर अग्रवाल, संजय डमाळे, युवासेनेचे शिवा टोम्पे, राजू गौर, जगदीश बेदवे, फहीम पठाण, जगन्नाथ कुदळ, विशाल प्रसाद, दिलीप वाघ, कृष्णा वाघ, राजू सुरडकर, संतोष वाघ, अशोक जाधव, खालेक पटेल, संजय कुमावत, विलास वाघ तसेच शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.