गुरुदेव संमतभद्र विद्यालयाला आ. बंब यांची भेट

Foto
खुलताबाद, (प्रतिनिधी) वेरूळ येथील गुरुदेव संमतभद्र विद्यालयाला बुधवारी (ता. १२) आमदार प्रशांत बंब यांनी भेट देऊन विद्याथ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच नैतिक मूल्ये, संस्कार आणि आत्मसंयम जोपासण्याचे आवाहन केले. याप्रसंगी आमदार बंब यांनी जय जिनेंद्र या जैन अभिवादनामागील गूढ अर्थ विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. 

ते म्हणाले की, जय जिनेंद्र हा फक्त नमस्कार नसून, शरीरातील सर्व इंद्रियांवर ताबा
मिळविण्याचा आणि आत्मसंयम राखण्याचा संदेश देणारा शब्द आहे. तो मनुष्य जन्माची महती आणि आध्यात्मिक उंची यांची जाणीव करून देतो. त्यांनी सांगितले की, यश केवळ गुणांवर अवलंबून नसून चारित्र्य, शिस्त आणि सकारात्मक विचारसरणी ही खरी माणुसकीची ओळख आहे. या कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वाकळे, माजी सभापती दिनेश अंभोरे, अॅड. विजय राठोड, गणेश हजारी, डॉ. सारंग पाटणी, अरुण पाटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.