औरंगाबाद: लोकसभा निवडणुकीचा रणधुमाळी हि तिसऱ्या म्हणजेच अंतिम टप्प्यात येऊन पोचली आहे. सर्वच मुद्द्यावरून पिछाडीवर पडलेल्या शिवसेना-भाजपा युतीने पुन्हा एकदा त्यांचे ब्रम्हास्त्र मानला जाणाऱ्या हिंदुत्ववादी मुद्दा उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. या ब्रम्हास्त्राचा सामना करण्याचे मोठे आव्हान सध्या काँग्रेस समोर आहे. औरंगाबाद लोकसभा मतदार संघात 23 एप्रिल रोजी मतदान होणार असल्याने निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे. विविध पक्ष संघटनांच्या वतीने मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी, सभा आदीच्या मध्यमातून मतदार जोडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मतदारसंघात गेल्या चार टर्मपासून खासदार असलेले शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यंदा च्या निवडणुकीत विविध प्रश्नावरून कोंडीत पकडले जात आहेत. काँग्रेसने देखील हाच धागा पकडत जोरदार प्रचार केला. यात विविध ठिकाणी शहरातील समस्या चे पोस्टर देखील झळकले.
आता प्रचार अंतिम टप्प्यात आला असल्याने, सर्वच मुद्द्यावरून पिछाडीवर पडलेल्या शिवसेना-भाजप युतीने त्यांचे ब्रह्मास्त्र म्हणून सर्वत्र परिचित असलेला हिंदुत्ववादी मुद्दा उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तसे मेसेज देखील फिरत आहे. यात काही महिन्यांपूर्वी राजाबाजार येथे झालेल्या दंगलीचा देखील मुद्दा पहायला मिळत आहे. याच ब्रह्मस्त्रा चा वापर करून आज पर्यंत युतीचे उमेदवार खैरे यांनी काँग्रेसच्या बड्या-दिग्गज नेत्यांना पराभूत केले आहे. आज पर्यंतचा इतिहास बघितला तर यंदाच्या निवडणुकीतही या मुद्द्यावर मते मिळवून युतीचा उमेदवार पुन्हा निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मतदाना करीता प्रारंभी विविध मुद्यावरून प्रचारात आघाडी घेत युतीच्या उमेदवाराची कोंडी करणाऱ्या काँग्रेस समोर या ब्रम्हास्त्राचा सामना करण्याचे मोठे आव्हान आहे. काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी व उमेदवार सुभाष झांबड यांचे थिंकटॅंक या ब्रम्हास्त्राचा सामना कसा करते हे पाहणे उसुकतेचे ठरणार आहे.