छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): जिल्हा परिषदेला उपकर आणि १५व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून मिळालेल्या १३१ कोटी रुपयांच्या विकासनिधीच्या वाटपाचे नियोजन आता अंतिम टप्प्यात आले आहे. या निधीतून ग्रामीण भागातील विकासकामांना गती देण्यासाठी जिल्हा परिषदेत सध्या बैठका आणि चर्चाचे सत्र जोरात सुरू असून सदस्यांकडून प्रस्तावांचा पाऊस पडत आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. २७) अध्यक्ष अविनाश गलांडे यांच्या दालनात पदाधिकारी व सदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
उपकरातून ६६ कोटी, तर १५ व्या वित्त आयोगातून
६५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून घेण्यात येणाऱ्या हाती विकासकामांसाठी ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. त्यामुळे आपल्या गटातील जास्तीत जास्त कामांना मंजुरी मिळावी यासाठी जिल्हा परिषद सदस्यांकडून प्रस्ताव सादर करण्याची लगबग सुरू आहे. याच कारणाने सोमवारी जिल्हा परिषद कार्यालयात सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची मोठी वर्दळ होती. विविध विभागांमध्ये प्रस्तावांची छाननी, कामांच्या प्राधान्यक्रमाबाबत चर्चा आणि निधी नियोजनाच्या बैठका दिवसभर सुरू होत्या.
a こ
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions











