दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; अपघात 12 जणांचा मृत्यू

Foto

वैजापूर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर रात्री उशिरा सैलानी बाबाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला तर १८ जखमी झाले आहेत. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर जांबरगाव टोलनाक्यासमोर पहाटे दीड वाजता टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात ट्रॅव्हलरमध्ये प्रवास करणाऱ्या सुमारे १२ जणांचा मृत्यू झाला. सर्व मृत हे नाशिक शहरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. टेम्पो ट्रॅव्हलरमधील सर्व प्रवासी सैलानी बाबाच्या दर्शनासाठी गेले होते, असे सांगण्यात आले. शनिवारी ते पुन्हा नाशिकला परतत होते. वाटेत वैजापूर तालुक्यातील जांबरगावजवळ उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव वेगातील टेम्पो ट्रॅव्हलरने धडक दिली. या घटनेत ट्रॅव्हलरमध्ये बसलेले १८ जण गंभीर जखमी झाल्याचा अंदाज आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्यांना वैजापूर छ. संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker