अ.जा.उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी शहरात भव्य मोर्चा, सरकारच्या संभाव्य निर्णया विरोधात ५९ जाती एकवटल्या...

Foto
 छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो ): अनुसूचित जाती मध्ये वर्गीकरण करून मतभेद निर्माण करण्याचा घाट राज्य शासनाने सुरु केला. त्याच्या निषेधार्थ उपवर्गीकरण विरोधी समितीच्या वतीने  आज क्रांती चौकात रिमझिम पावसात भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात आंबेडकरी चळवळीतील विविध पक्षाचे नेते सहभागी झाले होते. हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित  होते.   
                                                
अनुसूचित जाती ला शासकीय आरक्षणात १३ टक्के आरक्षण मिळते.  अनुसूचित जाती वर्गात ५९ जातीचा समावेश आहे. पण त्यातील जातींच्या लोकांनी वर्गीकरण करण्याची मागणी केली आहे.  राज्य सरकार ही वर्गीकरण करण्याच्या मानसिकतेत आहे. त्याविरुद्ध जनतेचा रोष आहे. उपवर्गीकरण रद्द करावे, उपवर्गीकरनाविरुद्ध नेमलेली बदर समिती बरखास्त करावी  आरक्षणाची  शंभर टक्के अंमलबजावणी करावी, अनुशेष भरण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी, खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. 

या. मोर्चाचे नेत्रत्व रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर, भीम शक्ती चे प्रमुख खासदार चंद्रकांत हंडोरे माजी मंत्री बबनराव घोलप माजी मंत्री राजकुमार बडोले, बाबुराव माने, पूर्णा येथील माजी नगरसेवक प्रकाश कांबळे, माजी उपमहापौर प्रकाश निकाळजे  दिनकर ओंकार, गौतम खरात बाबुराव कदम, कचरू मोरे,  मधुकर मोरे, डी.पी. सिरसाठ, पुंजाराम मस्के, बाजीराव साळवे, बंडू कांबळे  रावसाहेब जावळे, रवी जावळे, विजय मगरे, अनिल गायकवाड, गौतम लांडगे, रामभाऊ पेरकर, आदी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. 

या मोर्चा ला पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हा मोर्चा क्रांती चौक येथून निघून पैठण गेट, गुलमंडी सिटी चौक, गांधी पुतळा, शहागंज फाजळपुरा, जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे विभागीय आयुक्त कार्यालय येथे पोहचणार आहे