छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रमुख क्रमांक १७ मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल मकरीये, समीर राजूरकर, किर्ती शिंदे, सीमा साळवे, यांच्या प्रचारार्थ सोमवारी राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा खासदार भागवत कराड, यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शेकडो लोकांच्या उपस्थिती मध्ये अभूतपूर्व अशी पदयात्रा काढण्यात आली.
नागेश्वरवाडी येथील विघ्नहर्ता गणेश मंदिरात आरती करून या पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. पुढे सुंदर नगर, भोईवाडा, पारधीपुरा, मिल कॉर्नर येथील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या यात्रेची सांगता करण्यात आली.
यावेळी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, सुहास दशरथे, संजय खनाळे, अरुण गुदगे, राजू स्नेही, अमृता पालोदकर, लता दलाल, राजू पारगावकर, हिरालाल बिरुटे, बाबा जाधव, मुकेश जाधव, सागर विसपुते, बंटी जोगदंड, श्रीधर बक्षी, प्रतीक कोल्हे, यांच्या सह मोठ्या प्रमाणात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते















