छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): समृद्धी महामार्गावर माळीवाडा टोलनाकापासून मुंबईच्या दिशेने जाणार्या महामार्गावर आज पहाटे ३ वाजून १ मिनिटाने मुंबईकडून बुलढाणाकडे जाणार्या साईराम ट्रॅव्हलने ट्रकला मागून धडक दिली. अपघात एव्हढा भीषण होता की, अपघातात ट्रॅव्हल्स जळून खाक झाली. यात सुदैवाने प्रवाशी बचावले मात्र चालकाचा दुर्दैवाने होरपळून मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती अशी की, ट्रॅव्हल्सने ट्रकला मागून धडक दिली. धडक एवढी जोरात होती की काही कळण्याच्या आतच ट्रॅव्हल्सने पेट घेत आग लागली. यात मात्र ट्रॅव्हल्समधील असलेले कुशन कव्हरमुळे देखील आग पसरत गेली. या आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांच्यासह तात्काळ पदमपुरा व कांचनवाडी अग्निशमन केंद्र पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यात प्रवाशी ट्रॅव्हल्सच्या पाठीमागून बाहेर काढण्यात यश आले. मात्र आगीत अमोल सुरेश शेलकर (वय ३८ वर्ष, रा. खामगाव, बुलढाणा) यांचा होरपळून मृत्यू झाला. आग एवढी भीषण होती की, ती विझविण्यासाठी चार ते पाच तास लागले. या कामी मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप अग्निशमन केंद्र अधिकारी विनायक कदम ड्युटी अधिकारी संजय कुलकर्णी, एच. वाय. घुगे, वाशिम पठाण, अग्निशामक जवान सुरज राठोड, अजिंक्य भगत, सचिन फुले, मतीन, पागोरे, बनकर, इशाख, वाहन चालक किशोर कोळी, मनोज राठोड, योगेश दुधे यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. तर तपास माळीवाडा पोलिसांच्या वतीने केला जात आहेत.
ट्रॅव्हल्समध्ये होते ३२ जण
सदरील ट्रॅव्हलमधे एकूण २९ प्रवासी २ ड्रायव्हर, १ कंडक्टर असे एकूण ३२ जण होते. ट्रॅव्हल्स मुंबईहून बुलढाणा मार्गे जात असताना ट्रॅव्हल्स ट्रकला मागून धडकली त्यामुळे ट्रॅव्हल्सने पेट घेतला. या घटनेत प्रवाशांना ट्रॅव्हल्सच्या मागून काढण्यात यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र या अपघातात चालक खिडकीजवळ असल्याने अडकले त्यामुळे त्यांना बाहेर निघता आले नाही आणि त्यांचा दुदैवाने होरपळून मृत्यू झाला.
मोठा अनर्थ टळला
ट्रॅव्हल्सने ट्रकला मागून धडक दिल्याने अपघात झाला. अपघात एवढा मोठा होता की, त्यात ट्रॅव्हल्सला आग लागली. आणि ट्रॅव्हल्सचा पुढील भाग चक्काचूर झाला. यात सुदैवाने प्रवाशांना ट्रॅव्हल्सच्या पाठीमागून काढता येणे शक्य झाले त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.