जामगाव परिसरात बिबट्याने पाडला वासराचा फडशा

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील जामगाव शिवारात गोदाकाठ परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून येथील पटेल यांच्या शेत वस्तीवर बिबट्याने हल्ला एका वासराचा फडशा पाडला आहे.

बुधवारी (दि.११) मध्यरात्री शिवारातील गट नंबर ३६२ मध्ये पटेल उस्मान शेख यांच्या शेतवस्तीवर बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला चढवून वासरू फस्त केले. पटेल यांनी सदर माहिती सरपंच बशीर पटेल यांना दिल्यावर त्यांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधून संबंधित वनपालांना पाचारण करून मृत्यू झालेल्या बिबट्याचा पंचनामा केला. यावेळी पशुवैद्यकीय शव अधिकाऱ्यांनी वासराचे विच्छेदन केले.

परिसरात किमान दोन ते तीन बिबटे आपल्या पिलांसह वावरत असल्याची माहिती यावेळी बशीर पटेल यांनी दिली. शेतकरी पशुपालकांना दिलासा देण्यासाठी परिसरामध्ये तत्काळ पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी बशीर पटेल यांनी केली आहे.