पुण्याच्या धर्तीवर शहरात होणार रिंग रोड

Foto
ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांची माहिती; शहराच्या चारही बाजूंनी जोडणीचे नियोजन
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि भविष्यातील विकासात्मक विस्तार लक्षात घेता, पुणे शहराच्या धर्तीवर छत्रपती संभाजीनगरच्या चारही बाजूंनी 'रिंग रोड' उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच, छत्रपती संभाजीनगर ते बिडकीनदरम्यान अत्याधुनिक सहापदरी रस्ता उभारण्याचेही नियोजन असून, यासंदर्भात सविस्तर सर्वेक्षण करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला दिले आहेत, अशी माहिती ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांनी शुक्रवारी (दि.
१३) पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
शहर आणि परिसरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी विविध रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. शेंद्रा ते बिडकीन आणि ढोरेगाव परिसरातील रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. औद्योगिक वसाहतींचा विस्तार, वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता स्स्ते विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे. दरम्यान, पुण्याच्या रिंग रोडच्या धर्तीवर शहराच्या चारही बाजूंनी रिंग रोड झाल्यास शहरांतर्गत वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल. बाहेरून येणाऱ्या वाहनांना शहरात प्रवेश न करता इच्छित मार्गावर जाता
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions
छत्रपती संभाजीनगर-बिडकीन सहापदरी
छत्रपती संभाजीनगर ते पैठण रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता रुंदीकरण आवश्यक आहे. बिडकीन औद्योगिक वसाहतीच्या विस्तरामुळे आता संभाजीनगर ते बिडकीन हा महत्त्वाचा मार्ग सहापदरी करण्याचा प्रस्ताव असून, आवश्यक सर्वेक्षण व अहवालाच्या प्रक्रियेला गती देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही मंत्री सावे यांनी सांगितले.
येईल. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यासह शहराच्या नियोजनबद्ध विस्तारालाही चालना मिळू शकते.
रस्ता रुंदीकरणाची मोहीम सुरूच
रस्ता रुंदीकरणाची मोहीम थांबली का, असा प्रश्न
विचारला असता मंत्री सावे यांनी तसे काही नसल्याचे स्पष्ट केले. दिवाळी संपली असून रस्ता रुंदीकरणाची कामे पुन्हा सुरू करावीत, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.